जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

दुचाकी पेटवली कोपरगावात गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील टिळकनगर परिसरात फिर्यादीने आपल्या घरासमोर उभी करून ठेवलेली ८५ हजार रुपये किमतीची बजाज पल्सर दुचाकी (क्रं.एम.एच.१७ सी.ई.६१९७) हि मध्यरात्रीच्या सुमारास काहीतरी अज्ञात ज्वालाग्राही पदार्थ टाकून त्याच परिसरातील आरोपी गोकुळ उर्फ तुषार राजेंद्र दुशिंग पेटवून दिली असल्याची फिर्याद शिवनाराण चंद्रकांत गंगूले (वय-२४) रा.टिळकनगर यांनी कोपरगाव पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

फिर्यादीने आपली वरील क्रमांकाची दुचाकी आपल्या घरासमोर उभी करून ठेवली असता आरोपी याने शुक्रवार दि.४ ऑगष्ट रोजीच्या मध्यरात्री २२.३० वाजेच्या नंतर व दि.५ ऑगष्ट रोजीच्या पहाटे १ वाजेच्या दरम्यान अज्ञात ज्वालाग्राही पदार्थ वापरून तो गाडीवर टाकून ती पेटवून दिली व गाडी जाळून टाकली असल्याने फिर्यादीचे ८५ हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी शिवनारायण गंगूले व आरोपी गोकुळ दुशिंग हे कोपरगाव शहरातील उपनगर असलेल्या टिळकनगर या परिसरातील रहिवाशी आहेत.फिर्यादीने आपली वरील क्रमांकाची दुचाकी आपल्या घरासमोर उभी करून ठेवली असता आरोपी याने शुक्रवार दि.४ ऑगष्ट रोजीच्या मध्यरात्री २२.३० वाजेच्या नंतर व दि.५ ऑगष्ट रोजीच्या पहाटे १ वाजेच्या दरम्यान अज्ञात ज्वालाग्राही पदार्थ वापरून तो गाडीवर टाकून ती पेटवून दिली व गाडी जाळून टाकली असल्याने फिर्यादीचे ८५ हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.या प्रकरणी फिर्यादी गंगूले याने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

कोपरगाव शहर पोलिसानी या प्रकरणी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.६४४/२०२०.भा.द.वि.कलम ४३५ प्रमाणे आरोपी गोकुळ दुशिंग याचे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.एस.एच.गायमुखे हे करीत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close