जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

महिलेवर शारिरीक अत्याचार,कोपरगावात गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील लक्ष्मीनगर येथील साठ वर्षीय महिलेला आपला मुलगा दारू पिऊन पडला असल्याचा बहाणा करून आडमार्गाला नेऊन कोकमठाण शिवारात एका शेताजवळ आरोपी नितीन लाल्या भोसले रा.कोकमठाण याने व त्याच्या दोन अनोळखी साथीदारांनी,” तू माझ्या पोरांना का मारले” असे म्हणून लाथा बुक्यांनी व काठीने मारहाण करून अन्य दोन आरोपीं निघून गेल्यावर फिर्यादी महिलेचे कपडे फाडून बळजबरीने शारीरिक अत्याचार केले असल्याची फिर्याद आपदग्रस्त महिलेने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल केल्याने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

प्रमुख आरोपी नितीन भोसले व ईतर दोन अनोळखी इसम यांनी फिर्यादी महिलेस,”तू,माझ्या पोरांना का मारले स असे म्हणून या महिलेस लाठ्या-काठ्यांनी व लाथा बुक्यांनी मारहाण केली आहे.त्यानंतर ते अनोळखी दोन इसम निघून गेल्यावर मुख्य आरोपी नितीन भोसले याने फिर्यादी महिलेचे कपडे बळजबरीने फाडले व तिच्यावर शारीरिक अत्याचार केले असल्याचे आपल्या फिर्यादीत म्हटलें आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”फिर्यादी महिला व आरोपी यांच्यात जुने वाद असून त्यातूनच आरोपी नितीन भोसले याने फिर्यादी महिलेचा राग मनात धरून आपदग्रस्त महिलेला शुक्रवार दि.४ ऑगष्ट रोजी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास तिच्या घरी जाऊन तिला सांगितले की,”तुझा मुलगा हा पांडू पाटलाचे शेतात दारू पिऊन पडला आहे” असा निरोप मिळाल्याने आपदग्रस्त महिला घाईघाईने घटनास्थळाकडे रवाना झाली असता तिला तिचा मुलगा मिळून आला नाही.ती परत येत असताना आरोपी नितीन भोसले व ईतर दोन अनोळखी इसम यांनी फिर्यादी महिलेस,”तू,माझ्या पोरांना का मारले स असे म्हणून या महिलेस लाठ्या-काठ्यांनी व लाथा बुक्यांनी मारहाण केली आहे.त्यानंतर ते अनोळखी दोन इसम निघून गेल्यावर मुख्य आरोपी नितीन भोसले याने फिर्यादी महिलेचे कपडे बळजबरीने फाडले व तिच्यावर शारीरिक अत्याचार केले असल्याचे आपल्या फिर्यादीत म्हटलें आहे.

या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसानी आपल्या दप्तरी गु.र.नं.६४३/२०२० भा.द.वि.कलम ३७६,३२३ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळी प्रभारी संगमनेर पोलीस उपविभागीय अधिकारी रोशन पंडित व पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर,सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांनी भेट दिली आहे.पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक बोरसे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close