जाहिरात-9423439946
आरोग्य

..त्या रुग्णालयाच्या विश्वस्तांवर गुन्हे दाखल करा-मागणी

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील आत्मा मालिक हॉस्पिटल मध्ये उपचारार्थ दाखल केलेले पत्रकार पांडुरंग रायकर यांच्यावर उपचार करण्यासाठी केवळ आर्थिक कारणासाठी दिरंगाई केली असल्याने “ते” रुग्णालय चालविणाऱ्या विश्वस्तांवर गुन्हे दाखल करावे अशी महत्वपूर्ण मागणी शिवसेनेचे माजी शहर प्रमुख भरत मोरे यांनी कोपरगावचे तहसीलदार यांना समक्ष भेटून व निवेदन देऊन केली आहे.

राज्यातील हॉटेल व्यावसायिकांनी सरकारच्या आदेशाने आपली हॉटेल बंद ठेवल्याने अनेक रुग्णांना आपल्या सकाळच्या वेळी नाश्ता करण्याची सोय नसल्याने हाल होत आहे.सकाळच्या जेवणापूर्वी गोळ्या औषधें घेणे गरजेचे आहे.मात्र हॉटेल बंद असल्याने या रुग्णांची ससेहोलपट होत आहे.त्यामुळे हि सर्व हॉटेल सकाळी सात ते सायंकाळी नऊ अशा वेळेत सुरु करावी-भरत मोरे,माजी शहरप्रमुख शिवसेना

कोपरगाव शहरात तात्कालिक कारणासाठी राहत असलेले पुणे येथील वृत्तवाहिनीचे कोरोना बाधित पत्रकार पांडुरंग रायकर यांच्यावर वेळेवर उपचार न केल्याने त्याना नाईलाजाने पुण्याला जावे लागल्याने त्यात काळ अपव्यय झाल्याने व तेथेही त्यांना प्राणवायू वेळेवर न मिळाल्याने त्यांना आपला प्राण हकनाक गमवावा लागल्याने राज्यातील पत्रकारांमध्ये असंतोष पसरला आहे.त्याची दखल विविध राजकीय संघटनांनी घेतली आहे.आरोग्य मंत्री यांनीही या घटनेची दखल घेऊन आपण पत्रकारांना आगामी अधिवेशनात पन्नास लाखांचे विमा संवरक्षण देऊ असे आश्वासित केले आहे.या पार्श्वभूमीवर कोपरगाव शिवसेनेचे माजी शहर प्रमुख भरत मोरे यांनी तहसीलदार यांना भेटून आपल्या मागण्यांचे निवेदन दिले आहे.

या निवेदनात त्यांनी पुढे म्हटले आहे की,पत्रकार रायकर याना वेळीच उपचार मिळाले असते तर त्यांचा जीव वाचला असता मात्र दुर्दैवाने तसे झाले नाही.त्यामुळे या मृत्यूची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करणे गरजेचे आहे.या खेरीज कोपरगाव येथील कोविड सेंटरला जास्त व्हेंटिलेटरची गरज असल्याने हि संख्या वाढवून जास्तीच्या प्राणवायूची व्यवस्था करावी.वर्तमानात शंभर की.मी.ची पायपीट करून प्राणवायूची व्यवस्था करावी लागते हि त्रुटी दूर करावी.कोपरगाव तालुक्यातील सर्व खाजगी वैद्यकीय पथकांनी व त्यांच्या सदस्यांनी आपले दवाखाने सुरु करून कोरोनावर उपचार सुरु करावे व भयभीत नागरिकांना दिलासा द्यावा असेही मोरे यांनी शेवटी म्हटले आहे.

राज्यातील हॉटेल व्यावसायिकांनी सरकारच्या आदेशाने आपली हॉटेल बंद ठेवल्याने अनेक रुग्णांना आपल्या सकाळच्या वेळी नाश्ता करण्याची सोय नसल्याने हाल होत आहे.सकाळच्या जेवणापूर्वी गोळ्या औषधें घेणे गरजेचे आहे.मात्र हॉटेल बंद असल्याने या रुग्णांची ससेहोलपट होत आहे.त्यामुळे हि सर्व हॉटेल सकाळी सात ते सायंकाळी नऊ अशा वेळेत सुरु करावी-भरत मोरे,माजी शहरप्रमुख शिवसेना

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close