जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

चर्मकार महासंघाच्या वतीने कोपरगाव तहसीलदार यांना निवेदन

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने
पदाधिकारी यांच्या उपस्थितीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियम पाळत तहसीलदार कार्यालय येथे नायब तहसीलदार श्रीमती कुलकर्णी यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले आहे.

मुंबईतील झी -५ निर्मीत माफिया या वेबसिरीज मध्ये भारतीय संविधान व आरक्षण या बाबत चर्मकार व वाल्मिकी समाजाच्या विषयी अतिशय खालच्या पातळीवर जातीवाचक अपशब्द वापरले असून त्यामुळे समस्त मागासवर्गीय समाजाची भावना दुखावली गेली आहे. राष्ट्रीय चर्मकार महासंघ संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी समाजकल्याणमंत्री बबनराव घोलप यांच्या आदेशाने या कृतीचा जाहीर निषेध करण्यात आला तसेच दुसरी घटना अत्यंत निंदनीय असल्याचे जिल्हाध्यक्ष अशोक कानडे यांनी सांगितले आहे.
उत्तर प्रदेश येथिल बलिया जिल्ह्यातील पीपरा या गावात राष्ट्रीय संत समाजसुधारक संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची मूर्ती जाळुन विटंबना करण्यात आली या दोनही घटनेचा निषेध करून हे कृत्य करणाऱ्या जातीयवादी शक्तींवर अँट्रासिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करुन तातडीने कार्यवाही करावी अन्यथा राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या माध्यमातून माजी मंत्री घोलप यांच्या नेतृत्वाखाली समस्त मागासवर्गीय समाज आता रस्त्यावर उतरून न्याय मागेल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.
निवेदनात राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे उत्तर विभागीय अध्यक्ष दिलीप कानडे, राज्यकार्यकारीणी सदस्य मारुती कानडे,माजी पंचायत समिती सदस्य तथा जिल्हाध्यक्ष अशोक कानडे ,युवा जिल्हाध्यक्ष दत्ता दुशिंग, शहर अध्यक्ष गणेश कानडे, जिल्हा उपाध्यक्ष देविदास कानडे,जिल्हा सचिव संजय पोटे, तालुका संघटक संजय सरवार,कार्याध्यक्ष अँड रमेश दुशिंग,युवा तालुकाध्यक्ष संतोष शिंदे,संतोष कानडे, सागर पोटे, योगेश दळवी कोपरगाव पोलीस ठाण्याचे खारतोडे आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close