कोपरगाव तालुका
गौण खनिजांची चोरी,आरोपींवर कारवाई करा-मागणी

कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील ग्रामपंचायत हद्दीतून बेकायदेशीर रित्या गौण खनिजाची चोरी होत असल्याची आपण तहसीलदार यांचेकडे तक्रार केली होती.मात्र दोन महिने उलटून गेले तरी अद्याप दोषींवर कोणतीच कारवाई झाली नाही याबाबत तक्रारदार अड्.नितीन पोळ यांनी आश्चर्य व्यक्त केले असून या गौण खनिज चोरांवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी एका निवेदनाद्वारे तहसीलदार यांचेकडे केली आहे.

गौण खनिज चोरी प्रकरणी छापा टाकण्यासाठी आलेल्या अधिकारी यांच्या नाकाखालून डंपर चालकाने डंपर पळून नेला.त्या वेळी ग्रामपंचायतच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचे यांचे पती तिथे समक्ष उपस्थित होते त्यांनीच सदर डंपर पळवून नेण्यास मदत केली महसूल अधिकाऱ्यांनी सदर मुरूम चोरीचा २५० ब्रास गौण खनिज चोरी गेल्याच पंचनामा देखील केला आहे. मात्र ग्रामपंचायत प्रमुख पदाधिकारी व प्रशासकीय प्रमुख यांनी संगनमत करून मुरूम चोरी सारखा गंभीर गुन्हा केला असूनही कारवाई होत नाही हे विशेष !
या बाबतची सविस्तर माहिती अशी की,”नाटेगाव ग्रामपंचायत हद्दीतून विद्यमान पदाधिकारी व प्रशासकीय प्रमुख यांच्या संगनमताने बेकायदेशीर गौण खनिज उपसा करून चोरून बेकायदा विक्री केला जात होता. त्यामुळे दोषींवर कारवाई व्हावी अशी लेखी तक्रार कोपरगाव येथील तहसीलदार यांच्या कडे केली होती. सदर तक्रारी मध्ये नाटेगाव ग्रामपंचायत प्रमुख पदाधिकारी व प्रशासकीय अधिकारी यांच्या संगनमताने मुरून चोरी करण्यात येत असल्याचे नमूद केलेले होते त्या तक्रारीची तत्काळ दखल घेत कोपरगाव येथील तहसीलदार योगेश चंद्रे यांनी त्वरित महसूल अधिकाऱ्या मार्फत छापा टाकून चौकशी केली मात्र छापा टाकण्यासाठी आलेल्या अधिकारी यांच्या नाकाखालून डंपर चालकाने डंपर पळून नेला.त्या वेळी ग्रामपंचायतच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचे यांचे पती तिथे समक्ष उपस्थित होते त्यांनीच सदर डंपर पळवून नेण्यास मदत केली महसूल अधिकाऱ्यांनी सदर मुरूम चोरीचा २५० ब्रास गौण खनिज चोरी गेल्याच पंचनामा देखील केला आहे. मात्र ग्रामपंचायत प्रमुख पदाधिकारी व प्रशासकीय प्रमुख यांनी संगनमत करून मुरूम चोरी सारखा गंभीर गुन्हा केला असून देखील अद्याप संबंधितांवर कोणतीही कारवाई केली नाही हे विशेष! म्हणून आपण दि. ८ ऑगस्ट रोजी पुन्हा तहसीलदार यांना निवेदन देऊन नाटेगाव येथील ग्रामपंचायतीचे प्रमुख पदाधिकारी व प्रशासकीय प्रमुख व संबंधित डंपर चालकांवर अवैध रित्या गौण खनिज चोरी प्रकरणी गुन्हा दाखल करावा अशी विनंती केली होती. मात्र अद्याप दोषींवर कोणतीही कारवाई झाली नाही दरम्यान या प्रकरणातून वाचण्यासाठी नाटेगाव येथील प्रमुख पदाधिकाऱ्याने पंचनामा करणाऱ्या येसगाव येथील तलाठ्यावर सदर पंचनामा करू नये व कारवाई करू नये म्हणून दबाव आणला व लाचलुचपत खात्याकडे तक्रार दाखल करून सापळा यशस्वी केला.अशा प्रकारे सदर प्रकरणात चोर सोडून संन्याशाला फाशी असा काहीसा प्रकार झाला असल्याचा त्यांनी दावा केला आहे.व प्रमुख आरोपी अद्यापही उजळ माथ्याने समाजात वावरत आहे. गौण खनिज प्रकरणी दोन महिने उलटून गेले तरी दोषींवर कुठलीच कारवाई होत नाही या बाबत अँड.नितीन पोळ यांनी खेद व्यक्त करून या दोषींवर कारवाई करावी अशी मागणी आपल्या निवेदनात केली आहे.