जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

दुचाकीची चोरी,कोपरगावात गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील मळेगाव थडी ग्रामपंचायत हद्दीत रहिवाशी असलेल्या श्रावण बाबुराव मोरे (वय-५२) यांच्या राहत्या घरासमोर उभी करून ठेवलेली हिरो कंपनीची स्प्लेंडर प्लस हि ५० हजार रुपये किमतीची दुचाकी (क्रं.एम.एच.१७,सी.एच.९६९१)हि अज्ञात चोरट्याने चोरून नेली असल्याची फिर्याद कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.

कोपरगाव तालुक्यात सध्या कोरोना कालखंडात दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले आहे.त्यामुळे दुचाकी स्वारात भीतीचे वातावरण पसरले आहे.अशीच घटना मळेगाव थडी येथे घडली आहे.फिर्यादी श्रावण मोरे यांनी आपली दुचाकी आपल्या घरासमोर उभी करून ठेवली असताना दि.२७ ऑगष्ट च्या सायंकाळी ७.३० ते दि.२८ ऑगष्ट सकाळी ५.३० पर्यंत कोणीतरी अज्ञात आरोपीने वरील क्रमांकाची दुचाकी चोरी करून नेली आहे.

या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात भा.द.वि.कलम ३७९ प्रमाणे अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.सी.एम.तोर्वेकर हे करीत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close