कोपरगाव तालुका
डाऊच बु.शिवारात अज्ञात तरुणांचे प्रेत !
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील डाऊच बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या गोदावरी नदी पात्रात आज सकाळी सात वाजेच्या सुमारास एका ३०-३५ वयाच्या एका अज्ञात तरुणांचे प्रेत पाण्यात तरंगताना आढळून आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून या बाबत तेथील पोलीस पाटील अण्णासाहेब विश्वनाथ कांबळे यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी खबर दिली असल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
गोदावरी नदी पात्रातून साधारण सोळा हजार क्युसेसने पाणी वाहत आहे.त्यामुळे विविध अपघाती घटना उघडकीस येत आहेत.डाऊच बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीत आज सकाळी सात वाजेच्या सुमारास अशीच एक घटना उघडकीस आली आहे.सदरचा तरुणांचा मृतदेह अत्यंत कुजक्या अवस्थेत असल्याने त्याची हि हत्या की आत्महत्या या बाबत अद्याप कुठलाही खुलासा झालेला नाही.
गोदावरी नदी पात्रातून साधारण सोळा हजार क्युसेसने पाणी वाहत आहे.त्यामुळे विविध अपघाती घटना उघडकीस येत आहेत.डाऊच बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीत आज सकाळी सात वाजेच्या सुमारास अशीच एक घटना उघडकीस आली आहे.सदरचा तरुणांचा मृतदेह अत्यंत कुजक्या अवस्थेत असल्याने त्याची हि हत्या की आत्महत्या या बाबत अद्याप कुठलाही खुलासा झालेला नाही.त्यामुळे या घटनेचा तपास करण्याचे मोठे आव्हान कोपरगाव शहर पोलिसांपुढे निर्माण झाले आहे.
या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसानी अकस्मात मृत्यू नोंदणी पुस्तकात ३६/२०२० सी.आर.पी.सी.१७४ प्रमाणे नोंद केली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार एस.जी.ससाणे हे करीत आहेत.या घटनेने डाऊच बुद्रुक व परिसरात खळबळ उडाली आहे.