आरोग्य
कोपरगावात आरोग्य सेवकांना पी.पी.ई.किट प्रदान

कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव पीपल्स बँकेच्या गणेशोत्सव मंडळाच्या वतीने कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांना कोरोना उपचारार्थ मदतगार शाबीत होणाऱ्या पी.पी.ई.किट व तत्सम साथ प्रतिबंधक साधनांचे वितरण नुकतेच बँकेचे अध्यक्ष अतुल काले यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले आहे.

नगर जिल्ह्यात बाधित रुग्णांचा आकडा २१ हजार ६७७ वर जाऊन पोहचला आहे.तर आता पर्यंत ३०३ जणांनी आपले प्राण देऊन किंमत चुकवली आहे.कोपरगाव तालुक्यातील १८ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे.गत काही दिवसात अनेक प्रमुख मान्यवरांना आपले प्राण गमवावे लागले आहे. सलग प्रतिदिन मृत्यूची नोंद वाढत चालली आहे.त्यामुळे नागरिकांची चिंता वाढत चालली आहे.
सदर प्रसंगी बँकेचे अध्यक्ष अतुल काले,उप-महाव्यवस्थापक जे.पी.छाजेड,मंडळाचे अध्यक्ष सि.एन.व्यास,व्हि.एच.रोठे, व सदस्य यांच्या हस्ते कोरोना कोविड सेंटर कोपरगाव येथे तहसीलदार योगेश चंद्रे,ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.कृष्णा फुलसौंदर व डॉ वैशाली बडदे यांचेकडे या साधनांचे वितरण करण्यात आले आहे.बँक कर्मचारी संघटनेच्या या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत आहे.