जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावातील ते प्रलंबित अहवाल आले !

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील ओमनगर परिसरात असलेल्या एक डॉक्टर बाधित सापडल्यावर आता त्यांच्याच घरातील आई (वय-६०),बहीण (वय-३८),व मुलगी (वय-१३ वर्ष)असे तीन बाधित रुग्ण आढळले असल्याने कोपरगाव शहरात खळबळ उडाली आहे.मात्र आधीच या कुटुंबातील हे संशयित बाधित संस्थांमक विलगीकरणात ठेवले असल्याने पुढील बराच धोका टाळण्यात प्रशासनाला यश आले आहे.आता या कुटुंबातील पाच व्यक्ती बाधित झाले आहेत.

ओमनगर परिसरातील दोन रुग्णांच्या संपर्कात आलेल्या ११ संशयित व्यक्ती आढळल्या आहेत.या खेरीज टाकळी ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या व धारणगाव रस्त्यालगत रहिवाशी असलेल्या मात्र मुंबई येथून आलेल्या रुग्णांच्या संपर्कात नऊ संशयित व्यक्ती आढळल्या आहेत.त्यांना तातडीने ताब्यात घेतले आहे.व कोपरगाव येथील कोरोना केंद्रात संस्थात्मक विलगीकरण कक्षात रवानगी केली होती त्यांचे श्राव तपासणीसाठी नगर येथील सिव्हिल हॉस्पिटल येथे तातडीने पाठवले गेले होते.ते अहवाल आज सायंकाळी उशिरा आले असून त्यात पंधरा जण निरंक आले आहे.तर या कोरोना बाधित डॉक्टरच्या घरातील आई,बहीण व मुलगी बाधित आढळल्याने खळबळ उडाली आहे.तर अन्य दोन संशयित रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव शहरात वर्तमानात कोणताही रुग्ण नसताना आता मंगळवार दि.१ जुलै रोजी धक्कादायक घटना उघड झाली असून कोपरगाव शहरातील खडकी रस्ता मार्गावर असलेल्या ओमनगर परिसरात असलेल्या एका खाजगी डॉक्टरला (वय-४५) व त्यांच्या वडिलांना (वय-७२) या दोघाना कोरोना विषाणूची बाधा झाली असून या खेरीज कोपरगाव तालुक्यातील टाकळी ग्रामपंचायत हद्दीत मुंबईहून आलेल्या एका पाहुण्याला (वय-४६) कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक बाब उघड झाली होती.त्यामुळे कोपरगाव शहर व तालुक्यात खळबळ उडाली होती.या तीनही कोरोना बाधित रुग्णांना तातडीने कोपरगाव कोरोना केंद्रातील विलगीकरण कक्षात हलविण्यात आले होते व हा परिसर तालुका प्रशासनाने प्रतिबंधित केला होता व त्यांच्या संपर्कात आलेल्या अन्य नागरिकांचा शोध सुरु केला होता.त्यात ओमनगर परिसरातील दोन रुग्णांच्या संपर्कात आलेल्या ११ संशयित व्यक्ती आढळल्या आहेत.या खेरीज टाकळी ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या व धारणगाव रस्त्यालगत रहिवाशी असलेल्या मात्र मुंबई येथून आलेल्या रुग्णांच्या संपर्कात नऊ संशयित व्यक्ती आढळल्या आहेत.त्यांना तातडीने ताब्यात घेतले आहे.व कोपरगाव येथील कोरोना केंद्रात संस्थात्मक विलगीकरण कक्षात रवानगी केली होती त्यांचे श्राव तपासणीसाठी नगर येथील सिव्हिल हॉस्पिटल येथे तातडीने पाठवले गेले होते.ते अहवाल आज सायंकाळी उशिरा आले असून त्यात पंधरा जण निरंक आले आहे.तर या कोरोना बाधित डॉक्टरच्या घरातील आई,बहीण व मुलगी बाधित आढळल्याने खळबळ उडाली आहे.तर अन्य दोन संशयित रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहे.आता नागरिकांचे या अहवालाकडे लक्ष लागले आहे.

दरम्यान आधीच कोपरगाव शहर आरोग्य विभागाने हा परिसर प्रतिबंधित केला आहे.त्यामुळे अधिकचे रुग्ण वाढणार नाही याची जबाबदारी प्रशासनावर वाढली आहे.त्यांना आता अधिक सतर्कपणे नागरिकांना सहकार्य करावे लागणार आहे.आधीच येवला शहरात आज आढळलेल्या २३ रुग्णासह जवळ्पास १५० रुग्ण आढळले आहे.तर सिन्नर तालुक्यात १५ रुग्ण आढळले आहे.वैजापूर तालुक्यात या धीच बरेच रुग्ण आहेत त्यामुळे आता कोपरंगावकर अधिकच तणावात आले आहे.त्यामुळे सतर्कता वाढवावी लागणार आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close