जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

प्रशासनाधिकारी कांबळे यांच्या कारभाराची चौकशी करा,अन्यथा आंदोलन

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शिक्षण मंडळाच्या प्रशासनाधिकारी कोपरगाव नगरपरिषदेत बदलून आल्यापासून कधीही नोकरीच्या मुख्यालयी राहात नाहीत.शासनाचे घरभाडे घेऊन त्या शासनाची फसवणूक करीत असून सेवानिवृत्त शिक्षकांची कामे अनेक दिवसापासून प्रलंबित आहेत.पत्रव्यवहार करूनही त्या त्याला प्रतिसाद देत नाही.आपल्या कर्तव्यावर दोन महिन्यातून एकदा येत असल्याने त्यांच्या कारभाराची चौकशी करावी अशी मागणी सेवा निवृत्त शिक्षक सोमनाथ उडावंत व एकनाथ नारायण वाघ या दोघा शिक्षकांनी नुकतीच केली असून त्यांच्यावर कारवाई केली नाही तर आपण आगामी शिक्षक दिनाच्या दिवशी प्राणांतिक उपोषण करू असा इशारा त्यांनी दिल्याने कोपरगाव शहरात खळबळ उडाली आहे.

कोपरगाव नगरपरिषदेत श्रीमती माधुरी कांबळे यांची प्रशासनाधिकारी म्हणून शिक्षण विभागात काही महिन्यांपूर्वी बदली झाली आहे.या सेवेच्या ठिकाणी त्यांनी राहून आपले कर्तव्य बजावणे अपेक्षित असताना त्या आपल्या सेवेच्या मुख्यालयी न थांबता नगर येथून जाऊन येऊन करत आहेत.त्या कधीही आपल्या कर्तव्यावर दिसत नाही त्यामुळे सेवानिवृत्त शिक्षकांना आपल्या अडीअडचणी अधिकाऱ्यापुढे मांडणे दुरापास्त होत आहे.

कोपरगाव नगरपरिषदेत श्रीमती माधुरी कांबळे यांची प्रशासनाधिकारी म्हणून शिक्षण विभागात काही महिन्यांपूर्वी बदली झाली आहे.या सेवेच्या ठिकाणी त्यांनी राहून आपले कर्तव्य बजावणे अपेक्षित असताना त्या आपल्या सेवेच्या मुख्यालयी न थांबता नगर येथून जाऊन येऊन करत आहेत.त्या कधीही आपल्या कर्तव्यावर दिसत नाही त्यामुळे सेवानिवृत्त शिक्षकांना आपल्या अडीअडचणी अधिकाऱ्यापुढे मांडणे दुरापास्त होत आहे.त्या आपल्या सेवेच्या जागी रहाणे अपेक्षित असताना त्या नगर येथून दोन महिन्यातून कधीतरी एक दिवस जा-ये करतात.त्यामुळे शिक्षक व संबंधित नागरिक यांच्या अडचणी मांडणे दुरापास्त होत आहे.त्या कधीही खरे बोलत नाही.त्यामुळे संबंधित सेवानिवृत्त शिक्षक वैतागले आहे.त्यांनी कधीही शाळेचा पट वाढविण्यासाठी प्रयत्न केलेला नाही.अनेक शिक्षक त्यांनी आपल्या कर्तव्यावर न ठेवता आपल्या कार्यालयांत ठेऊन घेतलेले आहेत.त्यांच्याकडून खाजगी कामे करून घेतली जात आहेत.त्यांनी कधीही एकही शाळेला भेट दिलेली नाही.शाळांचे अनुदान वेळेवर येऊनही त्यांनी ते कधीही शिक्षकांना वेळेवर दिलेले नाही.त्या मुले शासनाची बदनामी होत आहे.त्यामुळे या बेजबाबदार अधिकाऱ्याला ताबडतोब सेवेतून मुक्त करावे अन्यथा आपण येत्या शिक्षक दिनाच्या दिवशी प्राणांतिक उपोषण करू असा इशारा सोमनाथ उदावंत व एकनाथ वाघ यांनी शेवटी दिला आहे.

निवेदनाच्या प्रति शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड,शिक्षण उपसंचालक,नाशिक आयुक्त आ.आशुतोष काळे,जिल्हाधिकारी,नगराध्यक्ष विजय वहाडणे यांना पाठवल्या आहेत.निवेदनावर माधव मते,विठ्ठलराव देशमुख,प्रयागा मते,प्रयागा धनवटे,लक्ष्मणगिरी गोसावी आदींसह दहा जणांच्या सह्या आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close