जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात बेशिस्त वाहतूक,एकावर गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरात आपल्या ताब्यातील मारुती स्विफ्ट कार (क्रं.एम.एच.१५ एफ.टी.१९०) हि शहराच्या वाहतुकीला अडथळा होईल अशा रीतीने सप्तर्षी मळा श्री हॉस्पिटलच्या समोर लावल्याच्या कारणावरून कोपरगाव शहर पोलिसानी नुकताच राहुल हौशीराम घुमरे (वय-२८) रा.कोळगाव सांगवी ता.सिन्नर जि. नाशिक याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.त्यामुळे बेशिस्त वाहतूक करणाऱ्या कुठेही गाड्या लावणाऱ्या वहानचालकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

बेशिस्त वाहतूक हा भारतातील जनतेस लागलेला मोठा रोग आहे.नागरिकांना व वाहनचालकांना कितीही दंड केला तरी त्यात सुधारणा होताना दिसत नाही.केंद्रिय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दंडाच्या कालबाह्य रकमा काही महिन्यांपूर्वी वाढवल्या असल्या तरी वाहन चालक व मालक यांनी हि बाब गंभीरतेने घेतलेली दिसत नाही.

बेशिस्त वाहतूक हा भारतातील जनतेस लागलेला मोठा रोग आहे.नागरिकांना व वाहनचालकांना कितीही दंड केला तरी त्यात सुधारणा होताना दिसत नाही.केंद्रिय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दंडाच्या कालबाह्य रकमा काही महिन्यांपूर्वी वाढवल्या असल्या तरी वाहन चालक व मालक यांनी हि बाब गंभीरतेने घेतलेली दिसत नाही.कोपरगावात याचा नुकताच अनुभव आला असून नागरिकांनी बेशिस्तपणाचे दर्शन वारंवार घडवले आहे.सप्तर्षी मळा या ठिकाणी वरील क्रमांकाच्या मारुती स्विफ्ट कार चालकाने काल सायंकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास ऐन रस्त्यात आपले वाहन लावल्याने त्याचा वाहतुकीवर अनिष्ट परिमाण झाल्याचे दिसून आले आहे.वाहनचालक राहुल घुमरे यांच्यावर कोपगाव शहरात पोलीस ठाण्यात या प्रकरणी २२२-२०२० भा.द.वि.कलम २८३ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार चांद सय्यद हे करीत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close