कोपरगाव तालुका
सागर जोंधळे यांची तहसीलदार पदी निवड

संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राज्यसेवा परिक्षेचे निकाल नुकतेच जाहीर झाले असून कोपरगाव तालुक्यातील बहादराबाद येथील रहिवाशी व कर्मवीर काळे कारखान्याचे सेवानिवृत्त कर्मचारी पोपटराव जोंधळे यांचे पुतणे व प्रसिद्ध हॉलिबॉलपटु मिनानाथ जोंधळे यांचे सुपुत्र सागर जोंधळे यांची त्यात निवड झाली असून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पोलीस उपनिरीक्षकापासून ते पोलीस उपअधीक्षकापर्यंत तर नायब तहसीलदारापासून ते उपजिल्हाधिकाऱ्यापर्यंत पदांच्या परीक्षा घेतल्या जातात. याशिवाय विविध खात्यातील कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपिक आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी अशी पदे तसेच जिल्हा निवड समितीच्या माध्यमातून भरण्यात येतात.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पोलीस उपनिरीक्षकापासून ते पोलीस उपअधीक्षकापर्यंत तर नायब तहसीलदारापासून ते उपजिल्हाधिकाऱ्यापर्यंत पदांच्या परीक्षा घेतल्या जातात. याशिवाय विविध खात्यातील कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपिक आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी अशी पदे तसेच जिल्हा निवड समितीच्या माध्यमातून भरण्यात येतात.महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दरवर्षी काही पदांची भरती केली जाते.यामध्ये पोलीस उपनिरीक्षक,विक्रीकर निरीक्षक,मंत्रालय सहायक आणि लिपिक भरती यांचा समावेश आहे.राज्यसेवा (राजपत्रित) अधिकारी यांचीसुद्धा भरती घेण्यात येते.यामध्ये उप जिल्हाधिकारी,पोलीस उप अधीक्षक,तहसीलदार,विक्रीकर अधिकारी वर्ग-१, निंबधक वर्ग-१ व २, वित्त लेखाधिकारी वर्ग-१ आणि २, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी,नायब तहसीलदार,सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पदांचा समावेश असतो. यासाठी शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेचा पदवीधर किंवा पदवीच्या अंतिम वर्षाला असणे आवश्यक आहे. निवड होईपर्यंत तो पदवी उत्तीर्ण झालेला असावा लागतो.बहादराबाद येथील तरुण सागर जोंधळे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपले प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा बहादराबाद येथे तर माध्यमिक शिक्षण जवळके येथील माध्यमिक शाळेत पूर्ण केले होते.तर उच्च माध्यमिक शिक्षण के.जे.सोमय्या महाविद्यालय कोपरगाव येथे तर बी.ई.मेकॅनिकल पदवी शिक्षण संगमनेर येथील अमृतवाहिनी महाविद्यालयात पूर्ण केले आहे.या शिक्षणानंतर त्यांनी एक वर्ष पुणे येथे फोर्स मोटार या कंपनीत एक वर्ष नोकरी केली होती.या आधी २०१६ साली राज्य विक्रीकर निरीक्षक,२०१७-१८ साली सहाय्यक विक्रीकर आयुक्त या परीक्षा उत्तीर्ण होऊन वर्तमानात नाशिक येथे ते शासकीय सेवेत रुजू आहेत.सागर जोंधळे यांनी हे यश प्रतिकूल परिस्थितीत ग्रामीण भागात राहून मिळवले आहे हे विशेष ! त्याच्या निवडीचे आ. आशुतोष काळे,माजी आ.अशोक काळे,नगराध्यक्ष विजय वहाडणे, उपसभापती अर्जुन काळे कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे आदींनी अभिनंदन केले आहे.