कोपरगाव तालुका
चांदेकासारेत महिलेची आत्महत्या,पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील चांदेकासारे ग्रामपंचायत हद्दीतील रहिवाशी व एक वर्षांपूर्वी विवाह संपन्न झालेली महिला नीता रवींद्र मोरे (वय-२१) हिने आपल्याला होत असलेल्या शारीरिक व्याधीने त्रस्त होऊन आपल्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दवी घटना घडली आहे.या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.सदर महिला सात महिन्याची गरोदर असल्याची धक्कादायक माहिती उपलब्ध झाली आहे.
चांदेकासारे ग्रामपंचायत हद्दीत रहिवाशी असलेल्या नीता मोरे या संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथील माहेर असलेल्या महिलेचा विवाह एक वर्षांपूर्वी संपन्न झाला होता.त्यांना त्वचा रोग असल्याने पोटावर व गळ्यावर चट्टे उमटले होते त्यावर अनेक उपचार करूनही त्यांना त्याचा फायदा झाला नव्हता त्यामुळे त्या आपल्या जीवनाला कंटाळल्या होत्या.त्यांनी आता रात्री सर्व घरातील सदस्य झोपले असता गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव तालुक्यात असलेल्या चांदेकासारे ग्रामपंचायत हद्दीत रहिवाशी असलेल्या नीता मोरे या संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथील माहेर असलेल्या महिलेचा विवाह एक वर्षांपूर्वी संपन्न झाला होता.त्यांना त्वचा रोग असल्याने पोटावर व गळ्यावर चट्टे उमटले होते त्यावर अनेक उपचार करूनही त्यांना त्याचा फायदा झाला नव्हता त्यामुळे त्या आपल्या जीवनाला कंटाळल्या होत्या.त्यांनी आता रात्री सर्व घरातील सदस्य झोपले असता गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.या महिलेचा पती रात्री पाणी पिण्यास उठले असता त्यांच्या हि बाब लक्षात आली त्यांनी या बाबत आपल्या घरातील नातेवाईकांना याची कल्पना दिली व नंतर कोपरगाव तालुका पोलिसांना खबर केली आहे.कोपरगाव पोलिसानी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे,पोलीस निरीक्षक अनिल कटके,पोलीस उपनिरीक्षक सचिन इंगळॆ यांनी भेट दिली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन इंगळे हे करीत आहे.