जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

तीळवणी नजीक अपघात,दुचाकीस्वार ठार

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील कोपरगाव-वैजापूर या रस्त्यावर तीळवणी ग्रामपंचायत हद्दीत काल सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास दुचाकी व ट्रॅक्टर यांच्यात आमनेसामने झालेल्या अपघातात आपेगाव येथील दुचाकीस्वार संभाजी दत्तात्रय भुजाडे (वय-४०) हे गंभीर जखमी झाले असता त्यांना नजीकच्या नागरिकांनी उपचारार्थ कोपरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात नेत असताना त्यांचे निधन झाले आहे.या घटनेने तीळवणी,आपेगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

कोपरगाव-वैजापूर या रस्त्यावरून आपेगाव येथील ग्रामस्थ संभाजी दत्तात्रय भुजाडे हे सायंकाळी साडे सात वाजेच्या सुमारास आपल्या घराकडे येत असताना त्यांना समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरने जोराची धडक दिली त्यात ते गंभीर जखमी झाले.या अपघातामुळे नजीकच्या ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेतली व जखमी संभाजी भुजाडे यांना उपचारार्थ कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात हलविले जात असताना त्यांची प्राणज्योत रस्त्यातच मालवली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव-वैजापूर या रस्त्यावरून आपेगाव येथील ग्रामस्थ संभाजी दत्तात्रय भुजाडे हे सायंकाळी साडे सात वाजेच्या सुमारास आपल्या घराकडे येत असताना त्यांना समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरने जोराची धडक दिली त्यात ते गंभीर जखमी झाले.या अपघातामुळे नजीकच्या ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेतली व जखमी संभाजी भुजाडे यांना उपचारार्थ कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात हलविले जात असताना त्यांची प्राणज्योत रस्त्यातच मालवली आहे.त्यांना रुग्णालयात भरती केले असता उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यानी त्यांना मृत घोषित केले आहे.दरम्यान त्यांचे पार्थिव उत्तरीय तपासणीसाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालायत दाखल केले आहे.या प्रकरणी आज उशिरा पर्यंत कोपरगाव तालुका पोलिसानी या अपघाताचा ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला नव्हता त्यांची गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत चालू होती.या घटनेने आपेगाव परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.या घटनेला तालुका पोलिसानी दुजोरा दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close