जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्याची गरज-आवाहन

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

पर्यावरणाचा समतोल बिघडण्याला वाढलेले प्रदूषण जरी कारणीभूत असले तरी बेसुमार होत असलेली वृक्षतोड व नष्ट होत असलेली वनराई हेदेखील कारणीभूत आहे. त्यामुळे मागील काही वर्षापासून अनियमित व कमी प्रमाणात होत असलेले पर्जन्यमान, अति उष्णता,काही भागात कमी पर्जन्यमान तर काही भागात महापूर अशा अनेक संकटांना आपल्याला सामोरे जावे लागत आहे. हि परिस्थिती अशीच राहिली तर भावी पिढीचे भविष्य हे निश्चितपणे अंधकारमय होऊ शकते. त्यासाठी वेळीच खबरदारी घेणे गरजेचे असून फक्त वृक्ष लागवड न करता लावलेल्या वृक्षांचे संगोपन व संवर्धन करणे हि आपली सामाजिक जबाबदारी असून प्रत्येकाने हि जबाबदारी कर्तव्य समजून पार पाडावी असे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी केले आहे.


शहाजापूर ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक वनीकरण विभागाकडे १२ किलोमीटर वृक्ष लागवड व्हावी याबाबत पाठपुरावा केला होता. सदर पाठपुराव्याबाबत सामाजिक वनीकरण विभागाने सकारात्मक प्रतिसाद देऊन या परिसराचा आढावा घेऊन शहाजापूर, सुरेगाव, शहा रोड दुतर्फा २ किलोमीटर अंतरावर वृक्ष लागवड करण्यासाठी १००० वृक्ष रोपे उपलब्ध करून दिली होती. हा वृक्षारोपण सोहळा नुकताच आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते पार पडला याप्रसंगी ते बोलत होते. गुलमोहर, करंजी, जांभूळ, आंबा, चिंच आदींसह जंगली वृक्ष रोपांचा सामावेश असून सामाजिक वनीकरण विभाग या झाडांचे ३ वर्षापर्यंत संवर्धन करणार आहे अशी माहिती वनक्षेत्रपाल सौ.पूजा रक्ताटे यांनी दिली आहे. याप्रसंगी पंचायत समिती सभापती सौ.पोर्णिमा जगधने, उपसभापती अर्जुनराव काळे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक कोळपेवाडी सरपंच सूर्यभान कोळपे, ज्ञानेश्वर हाळनोर, गौतम बँकेचे व्हा.चेअरमन राजेंद्र ढोमसे, वनक्षेत्रपाल सौ.पूजा रक्ताटे, सहाय्यक लागवड अधिकारी सौ.श्रद्धा पडवळ(मेहेरखांब), शहाजापुरचे सरपंच सचिन वाबळे, उपसरपंच बाळासाहेब ढोमसे, सुरेगावचे सरपंच शशिकांत वाबळे, उपसरपंच सुनील कोळपे, प्राचार्य नूर शेख, प्राचार्य सुभाष भारती, पोलीस पाटील इंद्रभान ढोमसे, ग्रामसेविका सुप्रिया टोरपे, सदस्य, पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close