जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

गोदावरी पात्रात एकाचा मृतदेह,अकस्मात मृत्यूची नोंद

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील जेऊर पाटोदा ग्रामपंचायत हद्दीतील मंगळवार दि.१६ जून पासून बेपत्ता असलेला तरुण जालिंदर सोमनाथ पवार वय-(३०) यांचा मृतदेह आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास कोपरगाव बेट गोदावरी नदी पात्रात आढळून आल्याने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,सध्या पावसाळा लवकरच सुरु झाला असून गोदावरी नदीपात्रात सुमारे सहा हजार क्युसेकने पाण्याचा प्रवाह सुरु आहे.या नदी पात्रातील कोपरगाव बेट नाका या ठिकाणी एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आल्याने कोपरगाव शहरात खळबळ उडाली होती.या संबंधी कोपरगाव शहर पोलिसांना खबर करण्यात आली होती.त्या संबंधी शहर पोलिसानी घटनास्थळी तातडीने धाव घेऊन स्थळ पंचनामा केला होता.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,सध्या पावसाळा लवकरच सुरु झाला असून गोदावरी नदीपात्रात सुमारे सहा हजार क्युसेकने पाण्याचा प्रवाह सुरु आहे.या नदी पात्रातील कोपरगाव बेट नाका या ठिकाणी एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आल्याने कोपरगाव शहरात खळबळ उडाली होती.या संबंधी कोपरगाव शहर पोलिसांना खबर करण्यात आली होती.त्या संबंधी शहर पोलिसानी घटनास्थळी तातडीने धाव घेऊन स्थळ पंचनामा केला होता.व मृतदेह कोपरगाव शहर ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला होता.या संबंधी शहरात चर्चा पसरली असता ती जेऊर पाटोदा येथील गायब तरुणांच्या कुटुंबाच्या सदस्यांना समजली त्यांनी तातडीने ग्रामीण रुग्णालायत धाव घेतली.असता त्या मयत तरुणांची ओळख पटली असून बेपत्ता तरुण तोच असल्याचे त्यांनी ओळखले आहे.दरम्यान हा तरुण नदी पात्रात कसा मिळून आला.तो कशासाठी गेला होता.या बाबत माहिती मिळू शकली नाही.त्यांच्या कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार तो दि.१६ जून रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास घरी काही एक न सांगता घरातून निघून गेला होता.त्याचा मृतदेहच पोलिसांना हाती लागला आहे.त्यातून त्याने आत्महत्या केली की त्याची अज्ञात इसमानी हत्या केली याबाबत अद्याप कोठलीही माहिती उपलब्ध नाही.घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे,कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी भेट दिली आहे.

दरम्यान कोपरगाव शहर पोलिसानी या प्रकरणी आपल्या दप्तरी मयताचे वडिल सोमनाथ गोपीनाथ गायकवाड (वय-४५) यांनी दिलेल्या खबरी वरून अकस्मात मृत्यूची नोंद असलेल्या पुस्तिकेत २१/२०२० सी.आर.पी.सी.१७४ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.एस.एच.गायमुखे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close