जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

वारस हक्काच्या पैशावरून दोन भावात हाणामाऱ्या,गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

आपल्या वडिलांचे बँकेत ठेव ठेवण्याच्या पैशाच्या कारणावरून दोन भावात काल दुपारी चारच्या सुमारास लाठीकाठीने झालेल्या हाणामारीत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात आरोपी अण्णासाहेब हरिभाऊ कदम,रत्नमाला अण्णासाहेब कदम,ओमकार अण्णासाहेब कदम,तनुजा अण्णा साहेब कदम या चौघा जणा विरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात फिर्यादी अजय हरिभाऊ कदम यांनी गुन्हा दाखल केल्याने सुरेगाव परिसरात खळबळ उडाली आहे.या घटनेत फिर्यादी हा स्वतः जखमी झाला आहे.

सुरेगाव ग्रामपंचायत हद्दीत रहिवाशी असलेल्या कदम कुटूंबांचे आपल्या वडिलांचे काही रक्कम बँकेत ठेवलेली आहे.दरम्यान त्याची बँकेतील मुदत संपल्याने ती पावती पुन्हा नव्याने करण्यात येणार होती.मात्र हि रक्कम आपला भाऊ त्याच्याच नावावर वारस नोंद करून आपल्याला काही मिळून देणार नाही या भीतीने अण्णासाहेब कदम याने काठीने फिर्यादी अजय कदम व त्यांचे पत्नीला शिवीगाळ करून अण्णासाहेब कदम यांनी फिर्यादिस धरून ओंकार कदम याने हातातील काठीने अजय कदम यांचेवर हल्ला चढवला त्यात फिर्यादीचे डाव्या हाताच्या मनगटाच्या हाडास तडा गेला आहे.

सदर चे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव तालुक्यात सुरेगाव ग्रामपंचायत हद्दीत रहिवाशी असलेल्या कदम कुटूंबांचे आपल्या वडिलांचे काही रक्कम बँकेत ठेवलेली आहे.दरम्यान त्याची बँकेतील मुदत संपल्याने ती पावती पुन्हा नव्याने करण्यात येणार होती.मात्र हि रक्कम आपला भाऊ त्याच्याच नावावर वारस नोंद करून आपल्याला काही मिळून देणार नाही या भीतीने अण्णासाहेब कदम याने काठीने फिर्यादी अजय कदम व त्यांचे पत्नीला शिवीगाळ करून अण्णासाहेब कदम यांनी फिर्यादिस धरून ओंकार कदम याने हातातील काठीने अजय कदम यांचेवर हल्ला चढवला त्यात फिर्यादीचे डाव्या हाताच्या मनगटाच्या हाडास तडा गेला आहे.व फिर्यादीची पत्नी वैशाली कदम यांना ओंकार कदम व तनुजा कदम यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून केस धरून जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसानी आपल्या दप्तरी गु.र.नं.१४५/२०२० भा.द.वि.कलंम ३२४,३२३,५०४,५०६ ३४ प्रमाणे चारही आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार एम.ए. कुसारे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close