जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

पोलीस चौकीवरून पोलिसास मारहाण,गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील येसगाव ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या नगर-मनमाड या राज्यमार्गावर असलेल्या पोलीस चौकीवर जाऊन आरोपी पप्पू उर्फ संतोष पुंडलिक सोनवणे रा.खिर्डी गणेश याने आपल्या तोंडाला मुखपट्टी न बांधताच माझ्या जमिनीजवळ पोलीस चौकी का लावली ? असे म्हणून कर्तव्यावर असलेले पो.कॉ.विजय अर्जुन पाटील यांना आपल्या हातातील काठीने पायाच्या घोट्यास मारहाण करून शासकीय कामात अडथळा आणल्याची फिर्याद कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केल्याने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

पोलीस हा सामान्य माणसाचा मित्र आणि त्यांचा संरक्षक म्हणून गणला जातो.बऱ्याच वेळा दंगल,चोरी,पाकिटमारी, लूटमार,आपसा-आपसातील भांडणाच्या वेळी संकटाच्या घडीत आठवणीने प्रत्येकाला या घटकाकडे जाऊन व आपल्याला हमखास मदत मिळेल असा आशावाद निर्माण होतो.आणि काही अपवाद वगळता तो खराही आहे.त्यामुळे या घटकाकडे संकटमोचक म्हणून पहिले जाते.मात्र काही वेळा आपले कर्तव्य बजावताना माणसातील हैवाण जागा झाला की या संकटकाळी मदत करणाऱ्या घटकाला माणूस पायाखाली तुडविण्यास मागेपुढे पाहत नाही.

पोलीस हा सामान्य माणसाचा मित्र आणि त्यांचा संरक्षक म्हणून गणला जातो.बऱ्याच वेळा दंगल,चोरी,पाकिटमारी, लूटमार,आपसा-आपसातील भांडणाच्या वेळी संकटाच्या घडीत आठवणीने प्रत्येकाला या घटकाकडे जाऊन व आपल्याला हमखास मदत मिळेल असा आशावाद निर्माण होतो.आणि काही अपवाद वगळता तो खराही आहे.त्यामुळे या घटकाकडे संकटमोचक म्हणून पहिले जाते.मात्र काही वेळा आपले कर्तव्य बजावताना माणसातील हैवाण जागा झाला की या संकटकाळी मदत करणाऱ्या घटकाला माणूस पायाखाली तुडविण्यास मागेपुढे पाहत नाही.याचे उदाहरण नुकतेच कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडले आहे.फिर्यादी पोलीस कॉ.विजय पाटील व त्यांचे सहकारी हे आपल्या कर्तव्यावर असताना रात्री साडे अकराच्या सुमारास आरोपी संतोष सोनवणे हा आपल्या ताब्यातील मारुती सुझुकी एस क्रॉस हि चारचाकी गाडी (एम.एच.१४ एफ.एक्स.१८८८) घेऊन घटनास्थळी आला व त्याने कोरोना विषाणूची साथ सुरु आहे हे माहित असताना आपल्या तोंडाला मुखपट्टी न बांधताच शासकीय कर्तव्यावर असलेल्या पो.कॉ.विजय पाटील यांना मोठमोठ्याने शिवीगाळ करून दमदाटी करून डाव्या पायाच्या घोट्यावर काठीने मारहाण करून सरकारी कामात अडथळा आणला व जीवे मारण्याची धमकी दिली आहे.या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसानी आपल्या दप्तरी गु.र.नं.१३९/२०२०भा.द.वि.कलम ३५३,३३२,३२३,५०४,५०६,१८८,२६९,२७० सह साथीचे रोग अधिनियम १८९७चे कलम २,३,४ प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिल कटके हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close