जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव तालुक्यात विकास कामे अव्याहतपणे सुरु ठेवणार-आश्वासन

जाहिरात-9423439946

संपादक–नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

जिल्हा परिषद पंचायत समिती सत्ता बदलानंतर कोपरगाव तालुक्याच्या ग्रामीण भागातील कानाकोपऱ्यात विकास कामांचा प्रवाह सुरु झाला असून यापुढेही हा प्रवाह असाच सुरु ठेवून विकासाच्या बाबतीत प्रत्येक गाव समृद्ध करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी तळेगाव मळे येथील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.अहमदनगर जिल्हा परिषद जनसुविधा योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या तळेगाव मळे ग्रामपंचायत कार्यालयाचे लोकार्पण आ.आशुतोष काळे यांच्या शुभहस्ते पार पडले याप्रसंगी ते बोलत होते.

विधानसभा निवडणुकीनंतर मतदार संघात सर्वदूर विकास पोहोचवण्याचा माझा प्रयत्न आहे.जागतिक कोरोना संकटामुळे राज्य शासनाच्या तीजोरीत येणाऱ्या महसुलावर परिणाम झाला आहे.त्यामुळे विकास कामांसाठी निधी मिळण्यात काही प्रमाणात उणीव भासणार असली तरी रस्ते,वीज,पाणी आदी विकासाचे रखडलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी भरघोस निधी आणून विकासकामे पूर्ण करण्यावर भर देणार आहे.

अहमदनगर जिल्हा परिषद जनसुविधा योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या तळेगाव मळे ग्रामपंचायत कार्यालयाचे लोकार्पण आ.आशुतोष काळे यांच्या शुभहस्ते पार पडले याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी पंचायत समिती सभापती पोर्णिमा जगधने,जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे,सोनाली साबळे,पंचायत समिती उपसभापती अर्जुन काळे,सदस्य मधुकर टेके,कोपरगाव जिनिंग प्रेसिंग संस्थेचे अध्यक्ष गोरक्षनाथ जामदार,अॅड.आर.टी.भवर,गोपाळराव भवर,सरपंच सचिन क्षीरसागर,उपसरपंच आशा टूपके, दत्तात्रय देवकर,मजहारी टूपके,साहेबराव शिंदे,बाबासाहेब डुकरे,दादा टूपके,गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे,अभियंता दिघे,ग्रामसेवक रामसिंग राठोड आदी मान्यवर उपस्थित होते.

सदर प्रसंगी पुढे बोलतांना ते म्हणाले की,”विधानसभा निवडणुकीनंतर मतदार संघात सर्वदूर विकास पोहोचवण्याचा माझा प्रयत्न आहे.जागतिक कोरोना संकटामुळे राज्य शासनाच्या तीजोरीत येणाऱ्या महसुलावर परिणाम झाला आहे.त्यामुळे विकास कामांसाठी निधी मिळण्यात काही प्रमाणात उणीव भासणार असली तरी रस्ते,वीज,पाणी आदी विकासाचे रखडलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी भरघोस निधी आणून विकासकामे पूर्ण करण्यावर भर देणार आहे.विधानसभा मतदारसंघातील विकास कामांचे अनेक प्रस्ताव व मागण्या शासन दरबारी मांडल्या असून त्याबाबत पाठपुरावा सुरु असल्याचे आ.काळे यांनी शेवटी सांगितले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close