जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

..या दोन गावात ग्रामसेवकास दमदाटी,चौघांवर गुन्हे दाखल

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोरोना साथ चालू असतानाही आपल्या मुलीस विंचुर येथून बेकायदा आणून त्यास आक्षेप घेतल्यावर त्यांची तपासणी न करताच पुन्हा रातोरात विंचुर येथे सोडून देऊन गावाच्या आरोग्यास बाधा उत्पन्न केल्या प्रकरणी जाबसाल करण्यास गेलेल्या आंचलगाव ग्रामसेवकास व त्यांच्या सहकाऱ्यांस अर्वाच्य शिवीगाळ केल्या प्रकरणी त्याच गावातील आरोपी भाऊसाहेब आप्पाजी शिंदे व त्यांची विंचुर येथील मुलगी मोनाली संदीप पाटील या दोघांच्या विरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात ग्रामसेवक भीमराज किसान बागुल (वय-३६) यांनी गुन्हा दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.दरम्यान अशीच घटना आज धोत्रे येथील तलाठी व ग्रामसेवक यांच्याबाबत घडली आहे.या दोन्ही घटनात चौघां आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.

दरम्यान अशीच घटना आज कोपरगाव तालुक्यातील धोत्रे येथे कामगार तलाठी सुशील राजेंद्र शुक्ला,व ग्रामसेवक अविनाश सीताराम पगारे यांचे विरुद्ध घडली असून या प्रकरणी आरोपी दगडू सटवा गुंजाळ व त्यांचा (सु)पुत्र शिक्षक अंबादास दगडू गुंजाळ या दोघांविरुद्ध उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.हे शिक्षक महाशय औरंगाबादहुन गुपचूप येऊन ग्रामपंचायतीस कुठलीही खबर न देता गुपचूप रहात होते. त्यामुळे हा गुन्हा बापलेकाविरुद्ध दाखल झाला आहे.

भारतात कोरोना विषाणूने अद्याप पर्यंत लागण झालेल्या नागरिकांची संख्या ८६४ ने वाढून ती १ लाख ७४ हजार ३५५ इतकी झाली असून ४ हजार ९८२ जणांचा मृत्यू झाला आहे.तर राज्यात आज अखेर हि संख्या ६२ हजार २२८ वर पोहचली आहे.राज्यात या विषाणूने २ हजार ०९८ जणांचा मृत्यू झाला आहे.तर नगर जिल्ह्यात हि संख्या १०२ वर जाऊन पोहचली आहे तर सहा जणांचा मृत्यू झाला आहे.अद्यापही हि संख्या वाढ थांबण्याचे नाव घेत नाही.मुंबई,ठाणे,पुणे,दिल्ली, मालेगाव, हि कोरोनाची नवी केंद्रे ठरली आहेत.कोपरगाव तालुक्यातही दोन बळी गेले आहे.त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.सरकारने स्वाभाविकपणे वाढत्या संक्रमणामुळे केंद्र सरकारने महाराष्ट्रातील टाळेबंदी तिसऱ्यांदा वाढवून ३१ मे पर्यंत केली आहे.कोपरगावात १९ एप्रिल नंतर दुसरा रुग्ण आढळला नव्हता.आता आजूबाजूच्या गावात कोरोना रुग्णांची मोठी भर पडत असल्याने नागरिकांत आता या साथीबाबत पुन्हा भय दिसून येत आहे.या पार्श्वभूमीवर कोपरगाव तालुका आरोग्य विभागाने हा भाग बाहेरील नागरिकांसाठी पूर्ण बंद केला आहे.मात्र तरीही काही नागरिक रात्री-अपरात्री आपल्या नातेवाईकांना घेऊन येतात व त्याची कुठलीही खबर ग्रामपंचायतीस दिली जात नाही.त्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य या कोरोना साथीत अडचणीत येण्याची शक्यता वाढल्याने शासनाने गावोगाव कोरोना प्रतिबंधक समित्या स्थापून त्यांना गावाची जबाबदारी सोपवली आहे.मात्र तरीही काही नागरिक रात्री-अपरात्री येऊन संशयित नागरिकांना वा नातेवाईकांना येऊन गावाचे आरोग्य धोक्यात आणीत आहेत.अशीच घटना अंचलगावात घडली असून वरील आरोपीने आपल्या कृतीमुळे कोरोना पसरण्याचा धोका आहे असे माहित असताना आपल्या विंचुर येथील मुलीस व तिच्या लहान बालकास विना परवानगी आणून मुक्कामी ठेऊन घेतले.त्यांनी ग्रामस्थांच्या आरोग्यास धोका निर्माण केला म्हणून सरपंच,पोलीस पाटील,आरोग्य सेविका,ग्रामपंचायत कर्मचारी असे आरोपीचे घरी जाऊन तपासणीचा आग्रह केला असता त्यांनी त्या मुलीस रात्रीच पुन्हा विंचुर येथे पाठवून दिले.या बाबत विचारणा केली असता त्याने अर्वाच्य शिवीगाळ केली आहे.व माझे सोबतच्या पदाधिकारी,कर्मचारी याना दमदाटी केली आहे.या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात आरोपी व त्याची मुलगी यांचे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.कोपरगाव तालुका पोलिसानी या प्रकरणी आरोपी विरुध्द गु.र.न.१३२/२०२०भा.द.वि.कलम १८८,२७०,२६९,१८६,५०४,५०६ सह साथीचे आजार अधिनियम १८९७ चे कलम २,३,४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.ए. एम.आंधळे हे करीत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close