जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

येसगावातील सरपंचासह कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब अजवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील येसगाव येथिल एका नागरिकांवर अंत्यसंस्कार करताना जमावबंदी आदेशाचे पालन न केल्या प्रकरणी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे त्याच गावातील नागरिकाने तक्रार दाखल झाल्या नंतर त्याची दखल प्रशासनास घ्यावी लागली असून आता थेट जिल्हाधिकाऱ्यांनी जा.क्रं.१५८६/२०२० ता.२२ मे रोजी या प्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिल्याने अखेर कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी येसगावातील कर्तव्यात कसूर करणाऱ्या सरपंच, ग्रामसेवक,पोलीस पाटील,यांच्यावर कारवाई करण्याबाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना कारवाई करण्याचे फर्मान सोडले आहे.त्यामुळे येसगावात खळबळ उडाली आहे.

येसगावात २१ मे च्या दरम्यान सायंकाळच्या सुमारास जमावबंदीचा आदेश मोडीत काढत मोठ्या गर्दीत एका व्यक्तीचा हा दफन विधी करण्यात आला होता.मात्र या बाबत येथील माहिती अधिकार कार्यकर्ते प्रभाकर रमेश गायकवाड यांनी त्याला जोरदार हरकत घेत त्याची तक्रार थेट पंतप्रधान कार्यालयापर्यंत केली होती.त्याच्या प्रति विविध वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांना पाठवल्या होत्या.त्याची दखल जिल्हाधिकारी कार्यालयाने घेतली असून त्यांनी या बाबत ग्रामपंचायतीचे उपमुख्याधिकारी जिल्हा परिषद यांना कारवाईसाठी पाठवले होते.त्यांनी या बाबत खाली तहसीलदार अन्य वरिष्ठ जमावबंदीचे उल्लंघन कलम १४४ प्रकरणी अधिकाऱ्यानां विचारणा व कारवाईचा अहवाल पाठविण्याचे आदेश दिले होते.

राज्यात कोरोनाची वाढ थांबण्याचे नाव घेत नाही परिणामी मुंबई,ठाणे,पुणे,दिल्ली,मालेगाव हि कोरोनाची नवी केंद्रे ठरली आहेत.कोपरगाव तालुक्यातही दोन बळी गेले आहे.या रुग्णाच्या अंत्यविधिस घरच्या नागरिकांना उपस्थित राहाता आले नव्हते.त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.सरकारने स्वाभाविकपणे वाढत्या संक्रमणामुळे केंद्र सरकारने महाराष्ट्रातील टाळेबंदी तिसऱ्यांदा वाढवून ३१ मे पर्यंत केली आहे.नागरिकांत अद्यापही या साथीच्या प्रसाराची भीती वाटत असल्याने अनेक ठिकाणी विरोध होऊ लागला आहे. व रुग्णाबांबत भय दिसून येत आहे.या पार्श्वभूमीवर कोरोना विषाणू ग्रस्त रुग्णांचा अंत्यविधी करणे हि बाब जोखमीची बनली आहे.या अंत्यविधिस आप्तांनाही परवानगी दिली जात नाही.कोपरगाव तालुक्यात अशा कोरोनाग्रस्त रुग्णांचा अंत्यविधिस आता विरोध होऊ लागला आहे.कोपरगाव तालुक्यातील टाकळी येथील रहिवाशी असलेला अल्पसंख्याक नागरिकांचा अन्य आजाराने २१ मे रोजी निधन झाले होते.त्यास कोरोना नसल्याने त्यांच्या पारंपरिक प्रथेप्रणाने दफन विधी होणे अपेक्षित होते.मात्र त्यांच्या समाजासाठी त्या गावात दफन भूमीच नसल्याने टाकळी येथील ग्रामस्थानीं त्याला हरकत घेतली होती.मात्र या मृत व्यक्तीचा एक मुलगा येसगाव येथे राहत असल्याने व तेथील एका राजकीय नेत्याने या समाजाला दफनभूमीला जागा देतो असे या पूर्वी आश्वासन दिले असल्याने त्यांनी अखेर येसगावात त्याच दिवशी सायंकाळच्या सुमारास मोठ्या गर्दीत हा दफन विधी करण्यात आला होता.त्या बाबत जमावबंदी आदेशाचा फज्जा उडवला होता.मात्र या बाबत येथील माहिती अधिकार कार्यकर्ते प्रभाकर रमेश गायकवाड यांनी त्याला जोरदार हरकत घेत त्याची तक्रार थेट पंतप्रधान कार्यालयापर्यंत केली होती.त्याच्या प्रति विविध वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांना पाठवल्या होत्या.त्याची दखल जिल्हाधिकारी कार्यालयाने घेतली असून त्यांनी या बाबत ग्रामपंचायतीचे उपमुख्याधिकारी जिल्हा परिषद यांना कारवाईसाठी पाठवले होते.त्यांनी या बाबत खाली तहसीलदार अन्य वरिष्ठ जमावबंदीचे उल्लंघन कलम १४४ प्रकरणी अधिकाऱ्यानां विचारणा व कारवाईचा अहवाल पाठविण्याचे आदेश दिले होते.याची प्रत कोपरगाव तहसीलदार यांनाही पाठवली होती.आता या बाबत तहसीलदारांनी या बाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना लेखी पत्र सरपंच,ग्रामसेवक,पोलीस पाटील,यांच्या विरुद्ध कर्तव्यात कसूर केल्या प्रकरणी योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले असून त्याचा हवाल पाठविण्यास बजावले आहे.त्यामुळे पोलीस अधिकारी आता नेमकी काय कारवाई करतात याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close