धार्मिक
…या ठिकाणी,’गोकुळाष्टमी उत्सव’ मोठ्या उत्साहात संपन्न

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या श्री गोकुळाष्टमी उत्सवानिमित्त श्री साईबाबा समाधी मंदिरात रात्रौ १२.०० वाजता श्रीकृष्णजन्म कीर्तन होवुन श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे.

श्री गोकुळाष्टमी उत्सवानिमित्त श्री साईबाबा समाधी मंदिरातील स्टेजवर दिनांक ०६ सप्टेंबर रोजी रात्रौ १० ते १२ यावेळेत ह.भ.प.स्मिता आजेगावकर यांचे श्रीकृष्णजन्म कीर्तन होवुन श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यात आला आहे.
सदर प्रसंगी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.शिवा शंकर,उप मुख्यकार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे, प्रशासकीय अधिकारी प्रज्ञा महांडुळे, मंदिर प्रमुख रमेश चौधरी,पुजारी,कर्मचारी व साईभक्त उपस्थित होते.त्यानंतर श्रींची शेजारती झाली आहे. तसेच आज सकाळी १०.०० ते १२.०० यावेळेत श्री गोकुळाष्टमी उत्सवानिमित्त श्री साईबाबा समाधी मंदिरातील स्टेजवर ह.भ.प.स्मिता आजेगावकर यांचे काल्याचे कीर्तन झाले आहे.किर्तनानंतर १२ वाजता समाधी मंदिरात दहीहंडी फोडण्यात आली आहे.
यावेळी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.शिवा शंकर,उप मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे, प्रशासकीय अधिकारी राजतिलक बागवे,मंदिर विभाग प्रमुख रमेश चौधरी,संरक्षण अधिकारी आण्णासाहेब परदेशी, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके,मंदिर पुजारी,कर्मचारी,शिर्डी ग्रामस्थ आणि साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था,शिर्डीच्या वतीने आयोजित केलेला श्री गोकुळाष्टमी उत्सव आनंदमय व भक्तीमय वातावरणात पार पडला आहे.