जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

शेती महामंडळाच्या जमिनीवर साठवण तलाव करणार !

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव विधानसभा मतदार संघातील शेती महामंडळाच्या पडित जमिनी उपयोगात आणून या जमिनीवर साठवण तलाव,पाझर तलावांची निर्मिती करता येईल का याबाबत आ. आशुतोष काळे यांनी नुकतीच शेती महामंडळाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आढावा घेतला आहे.

कोपरगाव मतदारसंघातील शेतकऱ्यांना वाटप केलेल्या जमिनीं व्यतिरिक्त उपलब्ध असलेल्या शेती महामंडळाच्या जमिनींची माहिती घेतली.व त्याबाबतचे प्रस्ताव पाठविणेबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या. यावेळी शेती महामंडळाचे विभागीय स्थावर व्यवस्थापक सुरेश अभंग व इतर अधिकारी सुरक्षित अंतर पाळुन उपस्थित होते.

कोपरगाव विधान सभा मतदार संघात गोदावरी डाव्या,उजव्या कालव्यालगत अनेक ठिकाणी शेती महामंडळाच्या शेकडो एकर जमीन पडीत आहे. या जमिनीवर जलसंधारण योजनेच्या माध्यमातून साठवण तलाव,पाझर तलावांची निर्मिती करून या जमिनी उपयोगात आणल्यास या साठवण तलाव व पाझर तलावात साठविलेल्या पाण्यातून आसपासच्या विहीर,बोअर वेल यांना फायदा होऊ शकतो. तसेच भूगर्भाची पाणी पातळी वाढण्यासाठी मोठी मदत होऊ शकते या उद्देशातून आ.आशुतोष काळे यांनी शेती महामंडळाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली.कोपरगाव मतदारसंघातील शेतकऱ्यांना वाटप केलेल्या जमिनीं व्यतिरिक्त उपलब्ध असलेल्या शेती महामंडळाच्या जमिनींची माहिती घेतली.व त्याबाबतचे प्रस्ताव पाठविणेबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या. यावेळी शेती महामंडळाचे विभागीय स्थावर व्यवस्थापक सुरेश अभंग व इतर अधिकारी सुरक्षित अंतर पाळुन उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close