जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव शहरात जागेवरून व्यापाऱ्यांचा गोंधळ,सौम्य लाठीमार

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगावात आज सकाळी अकराच्या सुमारास कोपरगाव नगरपरिषदेने जागा ठरवून देऊनही जुन्याच जागा पाहिजे या अट्टाहासासाठी अडून बसलेल्या भाजीपाला व्यापाऱ्यांना पांगविण्यासाठी कोपरगाव शहर पोलिसांना अखेर सौम्य लाठीमार करावा लागला आहे.त्यातून आजपर्यंतच्या कोरोना यशाला गालबोट लागल्याचे दुदैवी चित्र निर्माण झाले आहे.

आज पर्यंत नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी सहकार्य केल्याने कोपरगाव शहर व तालुका कोरोना मुक्त राहिला आहे.या पुढेही शहर व तालुका प्रशासनाला जास्त सहकार्याची गरज आहे.नागरिकांनी शहर हितासाठी व कोरोना बचावासाठी स्वतःहून पुढे येण्याची गरज आहे.सध्या जमावबंदी आदेश चालू आहे-विरेन बोरावके-गटनेते कोपरगाव राष्ट्रवादी काँग्रेस

कोपरगाव शहरात कोरोना साथीच्या काळात गर्दी होऊ नये यासाठी कोपरगाव पालिका व तालुका प्रशासन यांनी संयुक्त नियोजन करून वेगवेगळे प्रयोग राबवले होते.त्यातून कधी बाजार तळ तर कधी तहसील मैदान तर कधी संभाजी चौक,धारणगाव रास्ता,स्टेशन रस्ता असा रिवाज सुरु असताना दोन दिवसांपूर्वी टाळेबंदी उठल्याने कोपरगाव नगरपालिकेने आपल्या पूर्व जागेत म्हणजेच नेहरू भाजीपाला मार्केट मध्ये आज पासून पुन्हा पूर्ववत भाजीपाला बाजार सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.त्याची अंमलबजावणी आज सुरु होणार होती.

सर्व व्यापाऱ्यांना एकत्र बसून त्यांचे म्हणणे ऐकून कोपरगाव नगरपरिषदने सुवर्णमध्य काढावा.वर्तमानात हाताला काम नसल्याने व्यापाऱ्यांची संख्या वाढली आहे.मात्र नवीन माणसे आपलीच आहे त्यांच्या हाताला काम आवश्यक आहे.आपण आज घटनास्थळी नव्हतो.मात्र आधी नियोजन केले होते मात्र गोंधळ होणे धक्कादायक आहे-योगेश बागुल,उपनगराध्यक्ष कोपरगाव पालिका (शिवसेना)

आत जुने अधिकृत व्यापारी तर बाहेर शेतकरी असा जुनाच शिरस्ता सुरु राहणार होता.व त्यासाठी पालिकेने दैनंदिन गर्दी टाळण्यासाठी सोमवार हा बाजाराचा दिवस टाळून कोपरगावातील व्यापारीं व शेतकऱ्यांना बुधवार व रविवार ठरविण्यात आला होता.तर अन्य शेतकरी व व्यापाऱ्यांना मंगळवार व शुक्रवार असा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता.त्याची आज सुरुवात होणार होती त्याला आज काही व्यापाऱ्यांनी हरकत घेतली व नव्या ठिकाणी बाजार तळावरील नव्या ओट्यावर आमचा व्यापार होणार नाही असा पवित्रा घेतला आणि गोंधळाला सुरुवात झाली.नियमित व्यापाऱ्यांची त्याला हरकत नव्हती मात्र जे शहरातील व्यापारी आहे.मात्र ते सोमवार खेरीज अन्य खेडा बाजार करतात त्यांचा प्रश्न निर्माण झाला होता.व त्यांचा नव्या जागेतील ओट्यावर बसण्यास विरोध होता त्यातून या गोंधळाची सुरुवात झाली.त्यांनी नियोजित जागेत बसत नसलेल्या व्यापाऱ्या विरोधात कारवाई सुरु केल्याने गोंधळ सुरु झाला.या व्यापाऱ्यांनी अखेर आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी नगर नगरपरिषद अध्यक्ष विजय वहाडणे यांच्या दारात ठिय्या आंदोलन सुरू केले.जोडून अध्यक्षांचा धिक्कार सुरु केला.हि बाब कोपरगाव शहर पोलिसांना कळली त्यांनी या बाबतीत त्यांना जमावबंदी असल्याचे सांगून आंदोलन करण्यास मज्जाव केला.व त्यांना तेथून पिटाळून लावण्यासाठी सौम्य लाठीमार केला.आंदोलन कर्त्यात जास्त संख्येने व्यापारी महिला होत्या.

कोपरगाव नगरपरिषदेने बैठक घेऊन तोडगा काढला होता.त्या प्रमाणे शहरातील व्यापारी यांना नेहरू भाजी मार्केट मध्ये बसण्यास बुधवार आणि रविवार हे दोन वार तर बाकी बाहेरील व्यापाऱ्यांना मंगळवार आणि शुक्रवार असे दोन वार ठरले असल्याने गोंधळाचे कारणच नाही.व बाह्य व्यापाऱ्यांच्या वाराच्या दिवशी आमची नेहरू मार्केटची दुकाने प्रशासन बंद ठेवणार असल्याने गोंधळाचे कारणच उरत नाही-गणेश लकारे,अध्यक्ष भाजीपाला व्यापारी संघटना नेहरू मार्केट,कोपरगाव.

दरम्यान या बाबत अध्यक्ष विजय वहाडणे यांनी या बाबत म्हटले आहे की,कोपरगाव शहरातील सर्वच व्यावसायीकांचे व्यवसाय व्हावेत सर्वांना संधी मिळावी यासाठी तहसीलदार,मुख्याधिकारी,पोलीस निरीक्षक यांनी यथोचित नियोजन केले.नेहरू भाजी मार्केट सुरू केले.भाजीविक्रेते,भाजीपाला विकणारे शेतकरी,व इतर छोटे-मोठे व्यवसाय यांच्यासाठी वेळापत्रक व जागा निश्चित केल्या.पण आज पुन्हा काहीजण रस्त्यावरच बसल्यामुळे प्रशासनाने तसे करण्यास विरोध केला. त्यानंतर काहीनी महिलांना पुढे करून माझ्या घरासमोर घोषणाबाजी केली.आपण बाहेरगावी असतांना असा गोंधळ घालायला लावणाऱ्या सुत्रधारांना इशारा देताना ते म्हणाले कि,संपूर्ण शहराचा विचार करा.सध्या कोरोना हा विषाणूची भयंकर साथ चालू आहे.नागरिकांची सुरक्षा महत्वाची आहे.प्रत्येकजण रस्त्यावरच दुकान मांडून बसले तर,रहदारीचे काय ? शारीरिक सुरक्षेचे काय ? लाखो रुपये गुंतवणुक करून दुकाने,गाळे,शोरुम घेऊन व्यवसाय करणाऱ्यांनी त्यांचे व्यवसाय बंद करायचे का ? रस्त्याने रुग्णवाहिका,अग्निशामक जाऊ द्यायची कि नाही ? आमचेवर कुत्रे सोडण्याची धमकी दिली असे पोरकट आरोप करून मला बदनाम करण्याचा केविलवाणा प्रयत्नही केला गेला आहे.वार किंवा वेळ यात बदल करायचा असेल तर चर्चेतून मार्ग निघू शकतो.कायदा मोडून, गर्दि जमवून प्रशासनावर दबाव आणण्याइतके आपण मोठे नेते नाही.राष्ट्रीय आपत्ती असतांना आपण प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close