जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोरोना कालखंडात राजकारण अयोग्य-नगराध्यक्ष वहाडणे

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरेकोपरगाव-(प्रतिनिधी)जग कोरोना विषाणूच्या विळख्यात अडकलेले असताना व लाखो लोकांनी आपले प्राण गमावलेले असताना काही पक्षांनी राजकारण सुरु करवून ते कोरोना साथीचे गांभीर्य घालवून बसत आहे.वर्तमानात नागरिकांचा जीव वाचविण्यात अग्रक्रम देणे हि खरी प्राथमिकता असल्याचे प्रतिपादन कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी नूकतेच केले आहे.

देशातील प्रत्येक राज्यात व विशेषतः महाराष्ट्रात तर कोरोनाचे सर्वात जास्त रुग्ण असून वेग वाढतच आहे.असे असतांना सत्तारूढ पक्ष व विरोधी यांच्यात राजकिय संघर्ष वाढून जनतेलाच त्याची शिक्षा भोगावी लागू शकते.म्हणून अशा संकटकाळी तरी राज्यात “कोरोना” विषयावरून आंदोलन-संघर्ष-वाद होणे योग्य नाही.सत्तारूढ व विरोधी पक्षांनी समजुतदारपणे एकमेकांना प्रतिसाद देऊन कोरोना विरुद्ध एकजुटीने कसे लढायचे हे ठरविले पाहिजे.राजकारण करायला आयुष्य पडलेले आहे.आजच्या परिस्थितीत आंदोलन होणे योग्य नाही-वहाडणे

संपूर्ण जगभर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव जीवघेण्या वेगाने वाढत असून सक्रिय कोरोना रुग्णांत भारताने इटली या देशालाही मागे टाकले आहे.यातून मोठ्या प्रमाणात बळी जात आहेत.भारतही त्याला अपवाद नाही.देशातील प्रत्येक राज्यात व विशेषतः महाराष्ट्रात तर कोरोनाचे सर्वात जास्त रुग्ण असून वेग वाढतच आहे.असे असतांना सत्तारूढ पक्ष व विरोधी यांच्यात राजकिय संघर्ष वाढून जनतेलाच त्याची शिक्षा भोगावी लागू शकते.म्हणून अशा संकटकाळी तरी राज्यात “कोरोना” विषयावरून आंदोलन-संघर्ष-वाद होणे योग्य नाही.सत्तारूढ व विरोधी पक्षांनी समजुतदारपणे एकमेकांना प्रतिसाद देऊन कोरोना विरुद्ध एकजुटीने कसे लढायचे हे ठरविले पाहिजे.राजकारण करायला आयुष्य पडलेले आहे.आजच्या परिस्थितीत आंदोलन होणे योग्य नाही.राज्याराज्यात विविध पक्षांची सरकारे आहेत. एकमेकांना दोष देण्याचे राजकारण सुरू झाले तर ते सर्वांसाठी जीवघेणे ठरणार आहे. केंद्रात भाजपाचे सरकार आहे म्हणून त्यांचे विरुद्धही आरोप-प्रत्यारोप,आंदोलने सुरू होऊन देशभरातील वातावरण बिघडून कोरोना विरोधातील लढा कमजोर होऊ शकतो याचे भान सर्वांनीच ठेवणे गरजेचे आहे. सत्तारूढ पक्षाने विरोधकांशी चर्चा करावी व विरोधी पक्षांनीही सत्ता गेली म्हणून वैफल्यग्रस्त न होता आंदोलन करणे टाळले पाहिजे अशी अध्यक्ष विजय वहाडणे यांनी शेवटी म्हटलें आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close