जाहिरात-9423439946
नगर जिल्हा

..सरदार मल्हाररावांची पुण्यतिथी ऐवजी जयंती साजरी

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगावात तालुक्यात मराठेशाहीचे थोर सरदार मल्हारराव होळकर यांची आज पुण्यतिथी असताना कोपरगावचे भाग्यविधाते समजणारे युवराज व भाजपच्या माजी आमदारांनी आज सामाजिक संकेत स्थळावर चक्क जयंती साजरी करून आपल्या अकलेचे दिवाळे काढलेले आढळून आले आहे.या घटनेचा धनगर समाजाच्या युवकांनी निषेध व्यक्त केल्यावर त्यांनी आज उशिरा “हि” चूक सुधारून उशिराने पुण्यतिथीचे फोटो आपल्या सामाजिक संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे.या घटनेचा यशवंत सेना संघटनेचे उपजिल्हाप्रमुख किरण थोरात यांनी निषेध व्यक्त केला आहे.

कोपरगावात आज इंदूर संस्थानचे संस्थापक मल्हारराव होळकर यांची पुण्यतिथी साजरी करण्याऐवजी थेट घाईघाईने सकाळी सामाजिक संकेतस्थळावर जयंतीचा संकेत टाकून मोकळे झाले.मात्र यशवंत सेना संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या हि बाब लक्षात येऊन त्यांनी या बाबतचा सामाजिक संकेत स्थळावर जोरदार निषेध सुरु केला व त्यात,”जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या करायच्या नसेल तर करू नका पण आमच्या या थोर सेनानींचा अपमान करूनका” अशा आशयाचे संकेत सामाजिक संकेत स्थळावर सर्वत्र फिरू लागले.

छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केलेले स्वराज्य,निष्ठेने वाढविण्याची जबादारी सुभेदार मल्हारराव होळकरांनी आपल्या खांद्यावर घेतली होती.मराठी साम्राज्य वाढविण्याच्या कामी मल्हाररावांनी आपले सर्वस्व पणाला लावले आणि मराठी साम्राज्याच्या सीमा,अटकेपार सिंधू नदीपर्यंत वाढविल्या होत्या.मल्हाररावांनी दाभाड्यांचा एक सरदार कंठाजी कदमबांडे यांच्या पेंढारी टोळीतून आपली कारकीर्द सुरू केली होती.शिपाईगिरी करीत असताना तरुण पहिले बाजीराव पेशवे यांच्या बरोबर त्यांची खास मैत्री जुळून आली आणि आपल्या पराक्रमाच्या जोरावर इसवी सन १७२९ च्या सुमारास त्यांना माळवा प्रांताची सुभेदारी मिळवली.पानिपतनंतर मराठेशाहीची बिघडलेली घडी पुन्हा बसविण्यात माधवराव पेशव्यांबरोबर मल्हाररावांनी पुढाकार घेतला आणि सलग मोहिमा आखून ते स्वतःला कार्यमग्न ठेवू लागले.अशाच एका मोहिमेवर असताना २० मे १७६६ रोजी आलमपूर येथे मल्हारवांना मृत्यूने गाठले.

या पूर्वीही ६ डिसेंबर रोजी घट्नाकारांच्या पुण्यतिथींच्या दिवशी ढोल वाजविण्याचे पुण्यकर्म या नेत्यांच्या नावावर या आधीच जमा आहे.हा दुसरा प्रताप आज संपन्न झाल्याने याची चर्चा जिल्हाभर झाल्याचे दिसून आले आहे.

आपल्या संपूर्ण हयातीत त्यांनी चार पेशव्यांच्या कारकिर्दी बघितल्या.पेशव्यांच्या घरात त्यांना वडीलकीचा मान होता.अहिल्यादेवींनी त्यांच्या पश्चात आलमपूरचे नाव बदलून मल्हारनगर ठेवले आणि तेथे त्यांची छत्री उभी केली.अशा थोर सेनानीला आज महाराष्ट्र बऱ्याच वेळा विसरलेला दिसतो.आज देशभर अनेक महापुरुष जाती-जातीत विभागलेले दिसतात.त्यामुळे त्या-त्या नेत्यांच्या जयंत्या आणि पुण्यतिथ्या त्याच त्या संघटना करताना दिसतात.अलीकडे आपल्या मतदारांची मर्जी सांभाळण्यासाठी व मतपेटीत मतांची बेगमी करण्यासाठी राजकीय पक्षाचे नेते या पुण्यतिथ्या व जयंत्या साजऱ्या करताना हमखास दिसून येत आहे.त्याला कोपरगाव तालुकाही अपवाद नाही.कोपरगावात आज इंदूर संस्थानचे संस्थापक मल्हारराव होळकर यांची पुण्यतिथी साजरी करण्याऐवजी थेट घाईघाईने सकाळी सामाजिक संकेतस्थळावर जयंतीचा संकेत टाकून मोकळे झाले.मात्र यशवंत सेना संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या हि बाब लक्षात येऊन त्यांनी या बाबतचा सामाजिक संकेत स्थळावर जोरदार निषेध सुरु केला व त्यात,”जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या करायच्या नसेल तर करू नका पण आमच्या या थोर सेनानींचा अपमान करूनका” अशा आशयाचे संकेत सामाजिक संकेत स्थळावर सर्वत्र फिरू लागले.अखेर त्याची दखल भाजपच्या या महान नेत्यांना घ्यावी लागली.व दुपारून त्यांनी ती पोस्ट बदलून त्या ठिकाणी जयंती ऐवजी पुण्यतिथी अशी सुधारणा करून आपली “ती” चूक सुधारून सावरण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close