जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव पालिकेच्या शिक्षण प्रशासनाधिकाऱ्यांची मनमानी

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव नगर पालिका शिक्षण अधिकारी प्रशासन अधिकारी माधुरी कांबळे या कधीच आपल्या कार्यालयात हजर नसतात त्यामुळे सेवानिवृत्त शिक्षकांची आपले प्रश्न मांडताना मोठी तारांबळ होत असून या अधिकारी महिन्यातून एखाददोन वेळा हजर राहून शासनाचा घरभाडे भत्ता व अन्य सोयी सुविधा लाटीत असून शिक्षकांचे वेतन वेळेवर मिळत नसल्याने विद्यार्थ्यांसह अनेकांची मोठी कुचंबणा होत असल्याने यांची चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी कोपरगाव येथील सेवानिवृत्त शिक्षक सोमनाथ जगन्नाथ उदावंत यांनी राज्याच्या शिक्षण मंत्र्यांकडे केली आहे.

कोपरगाव पालिकेच्या प्रशासन अधिकारी या कधीच आपल्या कार्यालयात उपस्थित नसतात त्यामुळे आपल्या समस्या या सेवानिवृत्त शिक्षकांनी नेमक्या कोणापुढे मांडाव्या हि मोठी गंभीर समस्या निर्माण झाली आहे.सेवानिवृत्त शिक्षक सरकारकडून मिळणाऱ्या या वेतनावरच आपले जीवन कंठत असतात.त्यांना दुसरा आधार नसतो.मात्र त्यांना न्याय द्यायला कार्यालयात कोणीच नसते.नियुक्त अधिकारी या नगर येथून जाऊन-येऊन करत असतात.त्यांना पत्रव्यवहार केला तरी त्या उत्तर देत नाही.दिले तरी त्या असत्य उतारे देतात.

राज्याच्या शिक्षण विभागाने नगरपरिषद हद्दीत शिक्षणाचा दर्जा सुधारावा शिक्षकांचे पगार वेळेवर तर सेवानिवृत्त शिक्षकांचे वेतन वेळच्यावेळी मिळावे यासाठी पालिका हद्दीत शिक्षणाधिकारी यांची नेमणूक केलेली आहे.जे शिक्षक सेवानिवृत्त झाले आहे.त्यांना आपला जीवन चरितार्थ चालविणेसाठी आपले वेतन वेळेवर मिळणे आवश्यक आहे.मात्र कोपरगाव पालिकेच्या प्रशासन अधिकारी या कधीच आपल्या कार्यालयात उपस्थित नसतात त्यामुळे आपल्या समस्या या सेवानिवृत्त शिक्षकांनी नेमक्या कोणापुढे मांडाव्या हि मोठी गंभीर समस्या निर्माण झाली आहे.सेवानिवृत्त शिक्षक सरकारकडून मिळणाऱ्या या वेतनावरच आपले जीवन कंठत असतात.त्यांना दुसरा आधार नसतो.मात्र त्यांना न्याय द्यायला कार्यालयात कोणीच नसते.नियुक्त अधिकारी या नगर येथून जाऊन-येऊन करत असतात.त्यांना पत्रव्यवहार केला तरी त्या उत्तर देत नाही.दिले तरी त्या असत्य उतारे देतात.त्यांनी शाळेची पटसंख्या वाढविण्यासाठी कधीच प्रयत्न केलेले नाही.शाळांना भेटी दिलेल्या नाहीत.जर कोणी शिक्षक त्यांच्याकडे गेले तर त्या त्यांना उर्मट उत्तरे देतात.माझे कोणीही काही बिघडू शकत नाही.या बेताल अधिकाऱ्याची चौकशी करून त्यांच्यावर तातडीने कारवाई व्हावी अन्यथा आपण आगामी शिक्षक दिनी पाच सप्टेंबर रोजी तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण करू असा इशाराही सोमनाथ उदावंत यांनी शेवटी दिला आहे.निवेदनाच्या प्रति शिक्षण उपसंचालक,विभागीय शिक्षण आयुक्त,आ.आशुतोष काळे,जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी,नगराध्यक्ष विजय वहाडणे यांना दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close