जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

..या गावात महिलेचा विनयभंग,आरोपीवर गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील घारी ग्रामपंचायत हद्दीत रहिवाशी व घरकाम करत असलेल्या पंचवीस वर्षीय महिलेला तिच्या घरासमोर ओट्यावर जाऊन ,” माझी बायको पळवून लावली” म्हणून शिवीगाळ करत असता त्यास फिर्यादी महिला समजावून सांगत असताना आरोपी रवींद्र यादव मोरे याने फिर्यादी महिलेला आक्षेपार्ह भाषेत व लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्या प्रकरणी आरोपी विरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

आरोपी रवींद्र मोरे हा दारू पिऊन आला व त्याने फिर्यादी महिलेला आपल्या सासू,सासरे हे घराचे ओट्यावर बसलेले असताना त्याने फिर्यादी महिलेला शिवीगाळ करत म्हणाला की,”तूच माझी बायको पळवून लावली”,त्यावर फिर्यादी महिला त्याला समजावून सांगत असताना त्याने फिर्यादी महिलेची साडी धरून त्या महिलेला आक्षेपार्ह शब्दात अभद्र कृत्य करतो म्हणून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून या महिलेचा विनयभंग केला आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव तालुक्यातील घारी हद्दीत व घारी शिवारात रहिवाशी असलेल्या महिलेच्या शेजारीच आरोपी राहतो.दि.१८ मे रोजी सायंकाळी ७.३० च्या सुमारास आरोपी रवींद्र मोरे हा दारू पिऊन आला व त्याने फिर्यादी महिलेला आपल्या सासू,सासरे हे घराचे ओट्यावर बसलेले असताना त्याने फिर्यादी महिलेला शिवीगाळ करत म्हणाला की,”तूच माझी बायको पळवून लावली”,त्यावर फिर्यादी महिला त्याला समजावून सांगत असताना त्याने फिर्यादी महिलेची साडी धरून त्या महिलेला आक्षेपार्ह शब्दात अभद्र कृत्य करतो म्हणून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून या महिलेचा विनयभंग केला आहे.

या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसानी या आरोपी विरुद्ध गु.र.न.१२८/२०२० भा.द.वि. कलंम ३५४,३५४ (ब),५०४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.ए. बी.बाबर हे करीत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close