कोपरगाव तालुका
..या तालुक्यात २५ समुदाय अधिकाऱ्यांची नियुक्ती
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
देशभर कोरोना साथीचा कहर उडालेला असताना राज्य शासनाने आता आरोग्य सेवा सतर्क करताना आता तालुक्यातील एकतीस प्राथमीक उपकेंद्राअंतर्गत २५ समुदाय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली असल्याची माहिती कोपरगाव तालुका आरोग्य अधीकारी डॉ.संतोष विधाते यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
राज्यातील कोरोनाचा वाढता कहर पाहता, राज्य सरकारने वैद्यकीय क्षेत्रातील सर्व रिक्त जागा महिनाभरात भरण्याचा निर्णय घेतला होता. महत्त्वाचं म्हणजे कोणतीही परीक्षा न घेता, पूर्वीच्या शैक्षणिक पातळीवरील परीक्षांवरुन या जागा तातडीने भरल्या जातील,” असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केले होते. “सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच राज्यभरातील विविध महापालिका रुग्णालयांमध्ये जवळपास ३० हजार जागा रिक्त होत्या. या सर्व जागा महिना-दीड महिन्यात भरणार असल्याचे सांगण्यात आले होते.
भारतात कोरोना विषाणूने अद्याप पर्यंत लागण झालेल्या नागरिकांची संख्या १ हजार ३११ ने वाढून ती १ लाख ०७ हजार ७९२ इतकी झाली असून ३३१७ जणांचा मृत्यू झाला आहे.तर राज्यात आज अखेर हि संख्या ३७ हजार १३६ वर पोहचली आहे.राज्यात या विषाणूने १३२५ जणांचा मृत्यू झाला आहे.तर नगर जिल्ह्यात हि संख्या ६० वर जाऊन पोहचली आहे तर पाच जणांचा मृत्यू झाला आहे.अद्यापही हि संख्या वाढ थांबण्याचे नाव घेत नाही.मुंबई,ठाणे,पुणे मालेगाव व येवला हि कोरोनाची नवी केंद्रे ठरली आहेत.कोपरगाव तालुक्यातही दोन बळी गेले आहे.त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.सरकारने स्वाभाविकपणे वाढत्या संक्रमणामुळे केंद्र सरकारने महाराष्ट्रातील टाळेबंदी तिसऱ्यांदा वाढवून ३१ मे पर्यंत केली आहे.नागरिकांत अद्यापही या साथीबाबत भय दिसून येत आहे.या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने १७ हजार आरोग्य अधिकारी व कर्मचारी भरण्याचा निर्णय घेतला आहे.त्यातच या समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
कोपरगाव तालुक्यात ३१ उपकेंद्रे आहेत.या उपकेंद्रांमध्ये हे समुदाय आरोग्य अधिकारी नियुक्त केले आहेत.असंसर्रगजन्य आजार सर्वेक्षण करनेचा मुख्य उद्देश यांच्या नियुक्तीमागे आहे.यामध्ये बी.ए.एम.एस आणि एम.एस्सी.नर्सिंग शैक्षणिक अर्हता प्राप्त असलेल्या उमेदवारांची निवड झाली आहे. कोरोना साथीच्या काळात समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्या नियुक्तीमुळे कोपरगाव आरोग्य विभागास मोठे उच्च विद्याविभूषित मनुष्यबळ प्राप्त झाले आहे. कोवीड हॉस्पिटल कोपरगाव येथे समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांना वैद्यकीय अधिकारी यांचे सोबत कामाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.त्यात रक्तदाब,मधुमेह,मुख,स्तन आणि गर्भपिशवीचे कॅन्सर या असंसर्गजन्य आजारांचा या सर्वेक्षणात समावेश आहे.या नियुक्तीमुळे तालुक्यातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.