जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

किराणा उधारीच्या कारणावरून हाणामारी,अकरा जणांवर गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील गांधीनगर या उपनगरात दोन गटात गुप्ती,सूरी व काठीने झालेल्या तुंबळ हाणामारीत दोन जण गंभीर जखमी झाले असून कोपरगाव शहर पोलिसानी या प्रकरणी अक्षय गणेश आव्हाड (वय-२३) व सुरेश गंगाधर आव्हाड (वय-५२) या दोन्ही गटातील अकरा जणांवर दोन विविध गुन्हे दाखल केले आहेत.परिस्थिती तणावपूर्ण शांततेत आहे.

दुसऱ्या गुन्ह्यात सुरेश गंगाधर आव्हाड (वय-५२) याने आपल्या फिर्यादीत म्हटलें आहे की,”यातील आरोपी गणेश जाधव अक्षय जाधव, अनिकेत जाधव,अलका जाधव, सोनाली जाधव, श्रुती जाधव सर्व रा. गांधीनगर कोपरगाव यांनी किराणा दुकानातील उधारीचे पैसे मागितलेचे कारणावरून संगनमत करून गैरकायदायाची मंडळी जमवून आपल्यास व आपल्या भावास तसेच आपले दोन पुतणे याना शिवीगाळ करून गजाने व लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी केला आहे.व जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,अक्षय जाधव याने आपल्या फिर्यादीत म्हटले आहे की, या घटनेतील आरोपी रमेश आव्हाड राजेश आव्हाड, विशाल आव्हाड,कृष्णा नागरे, सुरेश आव्हाड, सर्व रा. गांधीनगर कोपरगाव यांनी मंगळवार दि.१८ मे रोजी दुपारी एकच्या सुमारास मागील भांडणाच्या कारणावरून गैकायद्याची मंडळी जमवून आपल्यास व आपले आई,वडील भाऊ,बहीण यांना शिवीगाळ करून सूरी,गज, गुप्ती दगड आदींच्या साहाय्याने मारहाण करून जखमी केले आहे.

तर दुसऱ्या गुन्ह्यात सुरेश गंगाधर आव्हाड (वय-५२) याने आपल्या फिर्यादीत म्हटलें आहे की,”यातील आरोपी गणेश जाधव अक्षय जाधव, अनिकेत जाधव,अलका जाधव, सोनाली जाधव, श्रुती जाधव सर्व रा. गांधीनगर कोपरगाव यांनी किराणा दुकानातील उधारीचे पैसे मागितलेचे कारणावरून संगनमत करून गैरकायदायाची मंडळी जमवून आपल्यास व आपल्या भावास तसेच आपले दोन पुतणे याना शिवीगाळ करून गजाने व लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी केला आहे.व जीवे मारण्याची धमकी दिली आहे.या प्रकरणी फिर्यादी सुरेश आव्हाड व फिर्यादीचा भाऊ व व दोन पुतणे जखमी झाले आहे. तर अक्षय जाधव व त्याचा भाऊ वडील जखमी झाले आहे.

या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसानी फिर्यादी अक्षय जाधव यांचे वतीने गु.र.न.१८३/२०२० भा.द.वि.कलम ३२४,३२३,५०४,५०६,१४३,१४७,१४८,१४९ प्रमाणे आरोपी रमेश आव्हाड,राजेश आव्हाड, विशाल आव्हाड,कृष्णा नागरे,सुरेश आव्हाड यांच्या विरुद्ध तर फ़िर्यादी सुरेश आव्हाड यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार आरोपी गणेश जाधव,अक्षय जाधव, अनिकेत जाधव,अलका जाधव,सोनाली जाधव, श्रुती जाधव यांच्याविरुद्ध गु.र.नं.१८५/२०२० भा.द.वि कलम. ३२४,३२३,५०४,५०६,१४३,१४७,१४८,१४९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.बी.एस.कोरेकर व श्री गायमुखे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close