जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

सार्वजनिक शांतता भंग,या गावात बारा जणांवर गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील संजयनगर या उपनगरात असलेल्या काही नागरिकांनी आपापसात काही कारणावरून सार्वजनिक जागेत येऊन झुंज करून मोठमोठ्याने आरडाओरडा करून सार्वजनिक शांततेचा भंग करत शासनाच्या जमाबंदी कायद्याचे उल्लंघन केल्या प्रकरणी सलीम हाजी हसन अत्तार यांच्यासह बारा जणांवर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

कोपरगाव नगरपरिषद हद्दीत शासनाने जमावबंदी कायदा लागू केलेला असतानाही काही नागरिक संजयनगर भागात दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास एकत्र येऊन आपल्या मालमत्तेच्या वाटणीवरून आपापसात जोरजोराने भांडत असल्याचे कोपरगाव शहर पोलिसांना मिळून आले त्यांनी आपल्या तोंडाला मास्क परिधान केलेले नव्हते.हि गंभीर बाब कोपरगाव शहर पोलिसांच्या लक्षात आली असल्याने बारा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

देशासह राज्यात कोरोना साथीने कहर उडवून दिला आहे.नगर जिल्ह्यात हि संख्या ५३ वर जाऊन पोहचली आहे तर दोघांचा मृत्यू झाला आहे.अद्यापही हि संख्या वाढ थांबण्याचे नाव घेत नाही.मुंबई,ठाणे,पुणे मालेगाव व त्यापाठोपाठ येवला हि कोरोनाची नवी केंद्रे ठरली आहेत.त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.सरकारने स्वाभाविकपणे वाढत्या संक्रमणामुळे केंद्र सरकारने महाराष्ट्रातील टाळेबंदी तिसऱ्यांदा वाढवून १७ मे पर्यंत केली आहे.कोपरगाव तालुक्यात दोन बळी गेले आहे.नागरिकांत अद्यापही या साथीबाबत भय दिसून येत आहे.प्रशासन तणावात आले आहे असे असताना कोपरगाव नगरपरिषद हद्दीत शासनाने जमावबंदी कायदा लागू केलेला असतानाही काही नागरिक संजयनगर भागात दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास एकत्र येऊन आपल्या मालमत्तेच्या वाटणीवरून आपापसात जोरजोराने भांडत असल्याचे कोपरगाव शहर पोलिसांना मिळून आले त्यांनी आपल्या तोंडाला मास्क परिधान केलेले नव्हते.हि गंभीर बाब कोपरगाव शहर पोलिसांच्या लक्षात आली.त्यांनी या प्रकरणी आरोपी सलीम अत्तार,उमर फारूक लतीफ अत्तार,अबू बकर लतीफ अत्तार,आकरम बाबूलाल अत्तार, अमजद बाबूलाल अत्तार, जाहिद गफार अत्तार,मजीद जाहिद अत्तार,मुबश्शीर जाहिद अत्तार,शकुर गफ्फार अत्तार,अब्रार शकुर अत्तार,मोबिन जाबीर अत्तार, मतीन जाबीर अत्तार आदी बारा आरोपी सर्व रा.बैलबाजार रोड कोपरगाव यांच्या विरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पो.कॉ. फिर्यादी संदीप शांताराम काळे यांनी गु.र.नं.१५९/२०२० भा.द.वि.कलम १६०,१८८(२),२६९,२७१,२९० प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.डी.आर.तिकोणे हे करीत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close