कोपरगाव तालुका
शिर्डी विमानतळावरून कार्गो सेवा सुरु करा-मागणी
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
भारतीय विमान विकास प्राधिकरणाने शिर्डी विमानतळाला देशातील इतर विमानतळाप्रमाणे कार्गो विमानसेवा सुरु करण्यासाठी परवानगी दिलेली आहे मात्र आज पर्यंत या विमानतळावरून कार्गो सेवा सुरू झालेली नाही. कोरोनामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत सापडले आहे. त्यामुळे या अडचणीच्या काळात कार्गो सेवा सुरू झाल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो.
त्यांनी मंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की,भाजीपाला व फळे हे नाशवंत आहे.त्यामुळे उत्पादित करण्यात आलेली फळे व भाजीपाला वेळेच्या आत बाजारात पोहोचला नाही तर फळे व भाजीपाला सडून जाऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते.मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या संकटाचा फटका हा शेतकऱ्यांना बसला आहे.सध्या विमान तळावरून सर्व प्रकारची प्रवासी विमानसेवा बंद आहे.भारतीय विमान विकास प्राधिकरणाने शिर्डी विमानतळाला देशातील इतर विमानतळाप्रमाणे कार्गो विमानसेवा सुरु करण्यासाठी परवानगी दिलेली आहे मात्र आज पर्यंत या विमानतळावरून कार्गो सेवा सुरू झालेली नाही. कोरोनामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत सापडले आहे. त्यामुळे या अडचणीच्या काळात कार्गो सेवा सुरू झाल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो. कार्गो सेवा सुरू करण्यासाठी विमान कंपन्या उत्सुक आहेत. या विमानतळावरून कार्गो सेवा सुरू झाल्यास अहमदनगर,नासिक,औरंगाबाद आदी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फायदा होईल.अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन शिर्डी विमानतळावरून तातडीने कार्गो सेवा सुरू करावी असे शेवटी आ. काळे यांनी शेवटी म्हटले आहे.