जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

.. त्या दोन संशयितांचे अहवाल अखेर प्राप्त

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यात कोरोनो रुग्णांची संख्या नुकतीच थांबलेली असताना दोन दिवसांपूर्वी पुन्हा दोन संशयित नागरिकांना आरोग्य विभागाने ताब्यात घेतले होते त्यांचा तपासणी अहवाल नुकताच प्राप्त झाला असून दोघांचा अहवाल नकारात्मक आला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारीं डॉ.संतोष विधाते यांनी नुकतीच दिली आहे.त्यामुळे तालुका प्रशासन व ग्रामस्थांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.

दरम्यान कोपरगाव शहराच्या रेल्वे स्थानक रस्त्यालगत माजी नगरसेवकांच्या वस्ती नजीक रहिवाशी असलेल्या इसमाचा आज दुपारी नाशिक येथे रुग्णालयात असताना मृत्यू झाला आहे.या बाबत नागरिकांत उलटसुलट चर्चा सुरु झाली असताना कोपरगाव शहर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली असून हा रुग्ण नाशिक येथे ब्रेन ट्यूमरच्या उपचारार्थ दाखल करण्यात आल्याची अधिकृत माहिती मिळाली आहे.तालुका प्रशासनाने पुढील विधीसाठी परवानगी दिली आहे.

भारतात कोरोना विषाणूने अद्याप पर्यंत लागण झालेल्या नागरिकांची संख्या २७५ ने वाढून ती ३३ हजार ३३८ इतकी झाली असून १०८२ जणांचा मृत्यू झाला आहे.तर राज्यात आज अखेर हि संख्या ९ हजार ९१५ वर पोहचली आहे.राज्यात या विषाणूने ४३२ जणांचा मृत्यू झाला आहे.तर नगर जिल्ह्यात हि संख्या ४२ वर जाऊन पोहचली आहे तर चौघाचा मृत्यू झाला आहे.अद्यापही हि संख्या वाढ थांबण्याचे नाव घेत नाही.मुंबई,ठाणे,पुणे मालेगाव हि कोरोनाची नवी हॉटस्पॉट ठरली आहेत.त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.सरकारने स्वाभाविकपणे वाढत्या संक्रमणामुळे महाराष्ट्रातील टाळेबंदी ३ मे पर्यंत सरकारने वाढविली आहे.कोपरगाव तालुक्यात दोन बळी गेले आहे.नागरिकांत अद्यापही या साथीबाबत भय दिसून येत आहे.या पार्श्वभूमीवर कोपरगाव तालुका प्रशासन अधिक सतर्क झालेले दिसून येत आहे.या पार्श्वभूमीवर कोपरगाव तालुक्यात हे दोन संशयित रुग्ण आढळून आले होते.या रुग्णापैकी एक करंजी तर दुसरा हा माहेगाव देशमुख येथील असल्याची माहिती होती.त्यामुळे प्रशासनात व या दोन्ही ग्रामस्थांत काळजीचा सूर उमटला होता.मात्र आज या दोन्ही रुग्णांचे अहवाल प्राप्त झाल्याने ग्रामस्थांसह तालुका प्रशासने समाधान व्यक्त केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close