गुन्हे विषयक
सरकारी कामात अडथळा,कोपरगावात गुन्हा दाखल

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे ग्रामपंचायत कार्यालयात काल दुपारी साडे चार वाजेच्या सुमारास येऊन आरोपी वामन महादू सोनवणे याने,”आपल्या नळाला पाणी का येत नाही ? तुम्हाला लक्ष देता येत नाही का ? असे म्हणून कार्यालयातील खुर्ची घेऊन आपल्या अंगावर मारावयास धावून आला व खुर्च्यांची मोडतोड करून शिक्क्यांचा बॉक्स फेकून दिला व शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली” असल्याचा गुन्हा तेथील ग्रामसेवक प्रल्हाद अंबादास सुकेकर रा.सह्याद्री कॉलनी कोपरगाव यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.
चांदेकसारे ग्रामपंचायत हद्दीत अनेक दिवसापासून पिण्याचे पाणी येत नाही.त्या बाबत त्यांनी अनेक वेळा ग्रापंचायत कार्यालयात तक्रारी करूनही उपयोग झाला नाही.त्यामुळे त्यांच्या सहनशीलतेचा कडेलोट झाला व ते कार्यालयात सोमवार दि.२५ ऑक्टोबर रोजी दुपारी ४.१५ ते ४.३० वाजेच्या सुमारास गेले व त्यांनी या बाबत ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक सुकेकर यांना जाब विचारला.त्यातून हा प्रकार उदभवला असल्याचे बोलले जात आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी प्रल्हाद सुकेकर हे कोपरगाव येथील सहयाद्री कॉलनीत रहिवासी असून ते कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवक या पदावर कार्यरत असून तेथे रहिवासी असलेली व्यक्ती व फिर्यादी वामन सोनवणे यांनीं ग्रामपंचायत कार्यालयातून घेतलेल्या पाण्याच्या नळाला गत अनेक दिवसापासून पिण्याचे पाणी येत नाही.त्या बाबत त्यांनी अनेक वेळा ग्रापंचायत कार्यालयात तक्रारी करूनही उपयोग झाला नाही.त्यामुळे त्यांच्या सहनशीलतेचा कडेलोट झाला व ते कार्यालयात सोमवार दि.२५ ऑक्टोबर रोजी दुपारी ४.१५ ते ४.३० वाजेच्या सुमारास गेले व त्यांनी या बाबत ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक सुकेकर यांना जाब विचारला.त्यातून हा प्रकार उदभवला असल्याचे बोलले जात आहे.फिर्यादी यांचे म्हणण्या नूसार आरोपी हा आपल्या कार्यालयात आला व “आपल्या नळाला पाणी का येत नाही ? तुम्हाला लक्ष देता येत नाही का ? असे म्हणून कार्यालयातील खुर्ची घेऊन आरोपी वामन महादू सोनवणे हा आपल्या अंगावर मारावयास धावून आला व खुर्च्यांची मोडतोड करून शिक्क्यांचा बॉक्स फेकून दिला व शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली” असल्याचा आरोप केला आहे.
या बाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा तेथील ग्रामसेवक प्रल्हाद अंबादास सुकेकर रा.सह्याद्री कॉलनी कोपरगाव यांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक भारत नागरे यांनी भेट दिली आहे.
कोपरगाव तालुका पोलिसांनी या प्रकरणी आरोपी विरुद्ध गु.र.क्रं.३६७/२०२१ भा.द.वि.कायदा कलम ३५३,४२७,५०४,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भारत नागरे हे पुढील तपास करत आहेत.