कोपरगाव तालुका
आरोग्य कर्मचाऱ्यांचे कोरोना युद्ध दखलपात्र-कौतुक
संपादक-नानासाहेब जवरेकोपरगाव-(प्रतिनिधी)
जगभर कोरोणाचे संकट आले असताना कोरोनाच्या संकटापासून नागरिकांना वाचविण्यासाठी आरोग्य विभागातील वैद्यक,परिचारिका,मदतनीस व त्यांचे सर्व सहकारी आपला जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य बजावीत असून प्रशासनाचे सर्व विभागाचे कर्मचारी त्यांच्या खांद्याला खांदा लावून कोरोनाशी लढत आहे.ते बजावीत असलेले कर्तव्य दखलपात्र असल्याचे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी नुकतेच केले आहे.
या वेळी राहाता तालुक्यातील कोपरगाव मतदारसंघात समावेश असलेल्या गावांसाठी पुणतांबा ग्रामीण रुग्णालय,सावळीविहिर प्राथमिक आरोग्य केंद्र,वाकडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी,आशा सेविका,आंगणवाडी सेविका,मदतनीस, पोलीस कर्मचारी,महसूल कर्मचारी,पत्रकार यांना सुरक्षा साहित्याचे वाटप करण्यात आले.यामध्ये ५० सुरक्षा संच,३ इन्फ्रारेड थर्मामीटर,१८० मि.ली. ७०० हस्त स्वच्छता द्रव्य, ७०० एन ९५ मास्क, १० मुखु सुरक्षा कापड व ७०० त्रिस्तरीय मुख सुरक्षा कापड,सुरक्षित अंतर ठेऊन वाटप करण्यात आले.
कोपरगाव विधानसभा मतदार संघातील राहाता तालुक्यातील पुणतांबा ग्रामिण रूग्णालय येथे प्राथमिक आरोग्य केंद्र वाकडी,सावळीविहीर,ग्रामिण रुग्णालय पुणतांबा येथील आरोग्य कर्मचारी व ग्रामविकास आधिकारी,मंडल आधिकारी,तलाठी,पत्रकार,आशा सेविका यांना कोरोनापासून बचाव व्हावा यासाठी आवश्यक असलेले सुरक्षा संच, हात स्वच्छता रसायन, एन -९५ मास्कचे वाटप सुरक्षित अंतर ठेवून आ.आशूतोष काळे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले आहे. या वेळी ते बोलत होते. यावेळी कोपरगाव विधानसभा मतदार संघात समाविष्ट असलेल्या राहाता तालुक्यातील पुणतांबा,रस्तापुर,चांगदेवनगर,वाकडी,जळगाव,चितळी,रामपूर, शिगवे, धनगरवाडी, न.पा. वाडी,एलमवाडी या अकरा गावातील अंत्योदय लाभार्थी कुटुंबांना महात्मा गांधी जिल्हा चॅरिटेबल ट्रस्ट श्री.साईबाबा तपोभूमी कोपरगाव यांच्यावतीने रेशनवर गहू,तांदूळ मोफत वाटप करण्यात आले होते त्या वाटप करण्यात आलेल्या धान्याच्या रक्कमेचा एक लाख सतरा हजार सहाशे बारा रूपयाचा धनादेश स्वस्त धान्य दुकानदार प्रतिनिधी गणेश प्रल्हाद थोरमोठे यांना आ.आशूतोष काळे यांच्या हस्ते देण्यात आला. विधानसभा मतदार संघाचा आमदार या नात्याने या ११ गावातील नागरिकांना आरोग्य सेवांसह अन्नधान्या वाचून वंचित राहु देणार नाही असे आमदार आशूतोष काळे यांनी स्पष्ट केले.या वेळी वाकडी ग्रामपंचायतीचे सरपंच डॉ. संपतराव शेळके, माजी सरपंच मुरलीधर थोरात, शांतीलाल भाटी, संजय धनवटे,सावीत्राभाऊ थोरात, शैलेश कुलकर्णी,अशोक धनवटे,विलास जगदाळे,सुनिल थोरात,दिलीप काबंळे,अरूण लावर,विलास पेटकर, प्रताप वहाडणे,डॉ.कुदंन गायकवाड , डॉ.स्वाती घोगरे, डॉ.श्रीधर घोगरे,डॉ.देविदास लव्हाटे,डॉ.संदेश गायकवाड,आरोग्य सेविका आनिता कुटे,सर्व आशा सेविका, मंडलअधिकारी चंद्रशेखर कुलथे,ग्रामविकास अधिकारी सोमनाथ पटाईत,तलाठी दिलीप कुसळकर, स्वस्त धान्य दुकानदार गणेश एलम, राहूल जोगदंड, योगेश धनवटे, अशोक जाधव सामाजिक अतंर ठेऊन उपस्थित होते. आरोग्य कर्मचाऱ्यांना सुरक्षा साहित्य दिल्याबद्दल व व ११ अंत्योदय योजनेतील कुटुंबांना मोफत रेशनवर धान्य उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्वांच्या वतीने माजी सरपंच मुरलीधर थोरात यांनी आभार मानले आहेत.