गुन्हे विषयक
मुलीने केला प्रेमविवाह,कुटुंब बहिष्कृत,जातपंचायतचा चमत्कारी फतवा !

न्यूजसेवा
कोपरगाव (प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथील नंदीवाले तिरमली जातपंचायतीने एका कुटुंबाला जातीमधून बहिष्कृत केले आहे.पीडित कुटुंबाच्या कर्त्या व्यक्तीच्या मुलीने जातीतच प्रेमविवाह केला असल्याने हा पवित्रा घेतला असल्याची माहिती हाती आली आहे.सदर घटना ही जातीच्या नियमाविरुद्ध असल्याचे सांगत पन्नास हजार रुपये दंड वसूल केला व सदर कुटुंबाला वाळीत टाकले असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.

कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथील रहिवासी असलेले भाऊसाहेब आनंदा अहिरे यांच्या मुलीने जातीतील सज्ञान मुलीने तिच्या जातीतीतलच एका मुलासोबाबत विवाह केला परंतु त्यांच्या जातपंचांनी तो विवाह अमान्य केला.धामोरी येथे जातपंचायत भरवून पीडित कुटुंबाला एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.पीडित कुटुंब हे अत्यंत गरिब असल्याची माहिती आहे.सुया-फण्या विकून पालामध्ये राहत कशीबशी उपजीविका करत आहे.त्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.
जात पंचायतींच्या अनिष्ट प्रथा खरोखरच अत्यंत चिंताजनक आणि महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याला काळिमा फासणाऱ्या आहेत.एकविसाव्या शतकातही काही समाजांमध्ये जात पंचायतींचे समांतर कायदे आणि मनमानी कारभार सुरू असणे ही एक गंभीर सामाजिक समस्या आहे.जात पंचायतींचे सर्वात घातक हत्यार म्हणजे ‘वाळीत टाकणे’.पंचायतीचे आदेश न मानणाऱ्या कुटुंबाशी समाजातील इतर लोकांचे रोटी-बेटी व्यवहार,बोलणे आणि संबंध तोडले जातात.शुल्क कारणांवरून लाखो रुपयांचा अमानुष दंड ठोकणे,शारीरिक छळ करणे किंवा मानहानीकारक शिक्षा देणे यांमुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होतात.व्यक्तीचे स्वातंत्र्य,विवाह निवडण्याचा अधिकार आणि मूलभूत मानवी हक्कांवर गदा आणली जाते.यात प्रामुख्याने महिलांना अधिक मानसिक आणि शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागते.अशीच घटना कोपरगाव तालुक्यात धामोरी ग्रामपंचायत हद्दीत उघडकीस आली आहे.कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथील रहिवासी असलेले भाऊसाहेब आनंदा अहिरे यांच्या मुलीने जातीतील सज्ञान मुलीने तिच्या जातीतीतलच एका मुलासोबाबत विवाह केला परंतु त्यांच्या जातपंचांनी तो विवाह अमान्य केला.धामोरी येथे जातपंचायत भरवून पीडित कुटुंबाला एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.पीडित कुटुंब हे अत्यंत गरिब असल्याची माहिती आहे.सुया-फण्या विकून पालामध्ये राहत कशीबशी उपजीविका करत आहे.तरीही त्यांनी पन्नास हजार रुपये कर्ज जातपंचायतीला दिले.उरलेली रक्कम पीडित कुटुंब देऊ शकले नाही.त्यामुळे जातपंचांनी पीडितांच्या संपूर्ण कुटुंबाला अमानुष मारहाण केली आहे.त्यांच्याशी कुणीही बोलावयाचे नाही.सुख-दुःखाच्या प्रसंगात बोलवायचे नाही अन्यथा त्यांनाही दंड करून जातीबाहेर काढू असा फतवा काढला असल्याची माहिती हाती आली आहे.त्यांच्या मुलीला पण भेटून दिले जात नाही.कुटुंबाला जातपंचायतीकडून दिला जाणारा जाच,छळ कमी झाला नाही.जातपंचायतीच्या अन्यायकारक न्यायनिवाड्यामुळे स्वतःच्या भावाच्या अंत्यविधीला सुद्धा आनंदा अहिरे यांना उपस्थित राहता आले नाही.अशा प्रकारची अनेक धार्मिक,सांस्कृतीक कार्यक्रमांमध्ये अहिरे कुटुंबाला बंधनं घातली गेली.

दरम्यान पीडितांनी ही तक्रार महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे माजी अध्यक्ष अविनाश पाटील यांच्याकडे केली होती.त्यानुसार जातपंचायत मुठमाती अभियानाचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे व कोपरगाव अंनिसचे अध्यक्ष डॉ.अशोक गावित्रे यांनी पीडितांना घेऊन कोपरगाव ग्रामीण पोलिस ठाणे गाठले आहे.सामाजिक बहिष्कार विरोधी बहिष्कार विरोधी कायद्यान्वये जातपंचावर गुन्हा नोंद करण्याचे निवेदन पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना दिले असल्याची माहिती हाती आली आहे.त्याप्रमाणे तक्रार दाखल झाली असल्याची माहिती डॉ.गावित्रे आणि कृष्णा चांदगुडे यांनी आमचे प्रतिनिधीस दिली आहे.त्यामुळे आता पोलिस अधिकारी काय कारवाई करणार याकडे कोपरगावसह अहिल्यानगरचे लक्ष लागुन राहिले आहे.



