जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावातील ..तो निम्मा परिसर झाला पिंजून

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील लक्ष्मीनगर या उपनगरात एक साठ वर्षीय महिला कोरोनाबाधित आढळल्याने तालुका प्रशासन आता खडबडून जागे झालेल्या शहर प्रशासनाने लक्ष्मीनगर व संलग्न साईनगर,धारणगाव रस्ता हा परिसर सील केला असून या महिलेच्या संपर्कात आलेल्या कुटुंबातील सहा जण व त्या कुटुंबाच्या संलग्न मित्र,रिक्षाचालक,त्याची पत्नी,त्याचा लहान नऊ महिन्याचा मुलगा,दूधवाला व एक फायनान्सवाला असे अठरा जण दिवसभरात ताब्यात घेतले असून त्यांची रवानगी नगर ग्रामीण रुग्णालयात केली असून तेथे आरोग्य अधिकाऱ्यांच्या निगराणीत ठेवण्यात आले आहे.तर दुसरिकडे आरोग्य विभागाने हा परिसर अतिसंरक्षित जाहीर करून आज दिवसभर या परिसरात अकरा आरोग्य पथके नेमून या उपनगरातील जवळपास पन्नास टक्के नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी डॉ.कृष्णा फुलसुंदर यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

आज आरोग्य विभागाने आपल्या आरोग्यसेवकांच्या अकरा पथकांनी या परिसराची तपासणी केली आहे.दिवसभरात जवळपास निम्मा परिसर तपासून झाला आहे.व उर्वरित उद्या तपासणी होण्याची शक्यता आहे.व अद्याप जे संशयित नागरिक ताब्यात घेतले आहेत त्यांचे अहवाल येणार असून त्याकडे शहरवासीयांचे लक्ष लागून आहे.

भारतात कोरोना विषाणूने अद्याप पर्यंत लागण झालेल्या नागरिकांची संख्या ७ हजार ६७७ इतकी झाली असून २४९ जणांचा मृत्यू झाला आहे.तर राज्यात आज अखेर १६२ ने वाढ होऊन ती संख्या १ हजार ५७४ वर पोहचली आहे.अद्यापही हि संख्या वाढ थांबण्याचे नाव घेत नाही.नगर जिल्ह्यात २७ रुग्ण आढळले असले तरी कोपरगावात मात्र अद्याप रुग्ण नवहता त्यामुळे बहुतेक नागरिक बिनधास्त होते.मात्र काल लक्ष्मीनगर येथील एका जेष्ठ महिलेला कोरोना असल्याचा अहवाल आल्याने मात्र कोपरगावात अनेकांची पाचावर धारण बसली व आरोग्य विभागासह अनेकांची पळापळ सुरु झाली.शहराच्या आरोग्य विभागाने रात्री एकच्या सुमारास दवंडी देऊन रात्रीच हा परिसर सील केला आहे.त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.आज आरोग्य विभागाने आपल्या आरोग्यसेवकांच्या अकरा पथकांनी या परिसराची तपासणी केली आहे.दिवसभरात जवळपास निम्मा परिसर तपासून झाला आहे.व उर्वरित उद्या तपासणी होण्याची शक्यता आहे.व अद्याप जे संशयित नागरिक ताब्यात घेतले आहेत त्यांचे अहवाल येणार असून त्याकडे शहरवासीयांचे लक्ष लागून आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close