कोपरगाव तालुका
..या पालिकेने केला निर्जंतुकीकरण कक्ष सुरु
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील नागरिकांच्या आरोग्याची रात्रंदिन काळजी वाहणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचेही आरोग्य ठीकठाक राहावे व कोरोना विषाणूपासून संरक्षण व्हावे यासाठी कोपरगाव नगरपरिषदेने विषाणू निर्जंतुकीकरण कक्ष उभारण्यात आला असून त्याबाबत नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्राप्त परिस्थितीत नागरिकांच्या आरोग्याची काळजी वाहण्यात महत्वाची भूमिका निभावण्यात आरोग्य विभाग अहंम भूमिका निभावत आहे.मात्र त्यांच्या आरोग्याची काळजी हा हि कळीचा मुद्दा ठरला आहे.त्यांची काळजी करण्याचे दायित्व कोपरगाव पालिकेने घेतले आहे.कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांच्या नेतृत्वाखाली व मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सुरु केला आहे.
भारतात कोरोना विषाणूने अद्याप पर्यंत लागण झालेल्या नागरिकांची संख्या ७ हजार ६७७ इतकी झाली असून २४९ जणांचा मृत्यू झाला आहे.तर राज्यात आज काही रुग्णांची वाढ होऊन ती संख्या १ हजार ५७४ वर पोहचली आहे.तर ११० जणांचे निधन झाले आहे.तर नगर जिल्ह्यात २७ रुग्णांची वाढ झाली असून एक जण दगावला आहे.अद्यापही हि संख्या वाढ थांबण्याचे नाव घेत नाही.त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.या परिस्थितीत नागरिकांच्या आरोग्याची काळजी वाहण्यात महत्वाची भूमिका निभावण्यात आरोग्य विभाग अहंम भूमिका निभावत आहे.मात्र त्यांच्या आरोग्याची काळजी हा हि कळीचा मुद्दा ठरला आहे.त्यांची काळजी करण्याचे दायित्व कोपरगाव पालिकेने घेतले आहे.कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांच्या नेतृत्वाखाली व मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सुरु केला आहे.लक्ष्मीनगर उपनगरात कोरोना रुग्ण सापडल्याने शहरात कहर झाला आहे.या पार्श्वभूमीवर कोपरगाव पालिकेने हा तातडीची निर्णय घेतला आहे.
यासाठी मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे, बांधकाम अभियंता डिगंबर वाघ,लेखापाल तुषार नालकर,विद्युत अभियंता रोहित सोनवणे,संगणक अभियंता भालचंद्र उंबरजे,चंद्रकांत साठे, राजेन्द्र गाढे, पाणीपुरवठा अभियंता ज्ञानेश्वर चाकणे,नारायण साबळे,राकेश आहिरे,स्वच्छता निरीक्षक सुनील आरण,तांत्रिक तज्ञ महारुद्र गालट आदींनी मेहनत घेतली आहे.
याबदल नगराध्यक्ष विजय वहाडणे,उपाध्यक्ष योगेश बागुल,आरोग्य सभापती अनिल आव्हाड यांच्या सह सर्व गट नेते व पदाधिकारी यांनी समाधान व्यक्त केले आहे.