कोपरगाव तालुका
..त्या आरोपीस १४ दिवसांची न्यायिक कोठडी !
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील ब्राम्हणगाव ग्रामपंचायत हद्दीत कोपरगाव तालुका पोलिसानी गस्तीवर असलेल्या पथकाने पकडलेला गुटखा व्यापारी शैलेश नागनाथ धप्पाधूळे रा.मनमाड या आरोपीस कोपरगाव तालुका पोलिसानी नुकतेच कोपरगाव न्यायालयासमोर हजर केले असता त्यास न्यायालयाने त्यास १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
कोपरगाव तालुका पोलिसानी अन्न व औषधी प्रशासनाची मदत घेऊन त्या अवैध गुटख्याची किंमत ठरवून आरोपी शैलेश धप्पा धुळे या विरूध्द ९६ हजारांचा घुटखा व ८० रुपयांची मारुती ओमनी गाडी असा १ लाख ७६ हजारांचा ऐवज जप्त करून आरोपी विरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
राज्यात कोरोना विषाणूंचा एकीकडे कहर सुरु असताना दुसरीकडे अवैध धंदे वाल्यांची पोलिसांना डोकेदुखी ठरत आहे.काही दिवसांपूर्वी सकाळी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन इंगळे व त्यांचे पथक आपली गस्त घालीत असताना त्यांना ब्राम्हणगाव ग्रामपंचायत हद्दीत एक मारुती ओमनी कार (क्रं.एम.एच.१५ के.८३११) हि सुमारे सात गोण्या गुटखा घेऊन कोपरगावकडून मनमाडकडे जाताना आढळल्याने पोलिसानी ती आपल्या ताब्यात घेतली होती.कोपरगाव तालुका पोलिसानी अन्न व औषधी प्रशासनाची मदत घेऊन त्या अवैध गुटख्याची किंमत ठरवून आरोपी शैलेश धप्पा धुळे या विरूध्द ९६ हजारांचा घुटखा व ८० रुपयांची मारुती ओमनी गाडी असा १ लाख ७६ हजारांचा ऐवज जप्त करून आरोपी विरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.व आरोपीस तालुका पोलिसानी कोपरगाव येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी वर्ग-१ न्या.श्री शेख यांचे समोर हजर केले असता त्यांनी आरोपीस १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.पुढील तपास कारवाई पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन इंगळे हे करीत आहेत.