जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
शैक्षणिक

समता पतसंस्थेने पालकत्व स्वीकारलेल्या विद्यार्थिनींचे मोठे यश

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

समता नागरी सहकारी पतसंस्थेने शैक्षणिक पालकत्व स्वीकारलेल्या विद्यार्थिनी पायल पटेल हिने आय.टी.क्षेत्रातील बी.ई.पदवी प्राप्त केली असून तिला बंगळुरू येथील क्रिप्ट इंडिया प्रा.ली.या आंतरराष्ट्रीय कंपनीत ८ लाख रुपये वार्षिक बिदागी देत निवड करण्यात आली आहे.तिच्या या यशाचे राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांनी अभिनंदन केले आहे.

कोपरगाव तालुक्यातील मुर्शतपुर गावात राहणारे अल्पसंख्यांक समाजातील गोटू सरदार पटेल यांनी सायकल वर फिरुन कपडे विकण्याचा व्यवसाय करत होते.त्यांच्या मुलीची शिकण्याची जिद्द व चिकाटीमुळे कु.पायल पटेल हिचे पालकत्व समताने स्वीकारले होते.आज त्या मुलीने कोपरगाव येथील संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयात आय.टी.क्षेत्रातील बी.ई.पदवीचे शिक्षण घेत बंगळूर येथील क्रिप्ट इंडिया प्रा.ली.या आंतरराष्ट्रीय कंपनीत ८ लाख रुपये वार्षिक पॅकेज देत निवड करण्यात आली आहे.

वर्तमानात मुलींनी सर्वच क्षेत्रात वर्चस्व प्रस्थापित केले आहे.शिक्षण क्षेत्रात ही नेहमी मुलींनीच बाजी मारलेली आहे.ज्या मुलींमध्ये शिक्षणाची आवड,जिद्द,चिकाटी असेल तर अत्यंत गरीब कुटुंबातील मुली ही स्वतःचे उज्वल भविष्य घडवत असतात आणि आई वडिलांच्या स्वप्नांबरोबर स्वतःची ही स्वप्ने पूर्ण करत असतात फक्त अशा गरजू,होतकरू मुलींना व तिच्या परिवाराला सहकार्याची गरज असते.कोपरगाव तालुक्यातील मुर्शतपुर गावात राहणारे अल्पसंख्यांक समाजातील गोटू सरदार पटेल यांनी सायकल वर फिरुन कपडे विकण्याचा व्यवसाय करत होते.त्यांच्या मुलीची शिकण्याची जिद्द व चिकाटीमुळे कु.पायल पटेल हिचे पालकत्व समताने स्वीकारले होते.आज त्या मुलीने कोपरगाव येथील संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयात आय.टी.क्षेत्रातील बी.ई.पदवीचे शिक्षण घेत बंगळूर येथील क्रिप्ट इंडिया प्रा.ली. या आंतरराष्ट्रीय कंपनीत ८ लाख रुपये वार्षिक पॅकेज देत निवड करण्यात आली आहे.ही तिच्या परिवारासोबतच समता परिवारासाठी देखील गौरवाची बाब ठरली आहे.असे मत समता परिवाराचे संस्थापक ओमप्रकाश कोयटे यांनी व्यक्त केले आहे.

समता परिवाराने पालकत्व स्वीकारलेल्या मुर्शतपूर येथील कु.पायल पटेल हिने मिळविलेल्या यशाबद्दल तिचा आणि तिचे वडील गोटु सरदार पटेल यांचा सत्कार समता परिवाराचे संस्थापक कोयटे यांच्या हस्ते करण्यात आला त्या प्रसंगी ते बोलत होते.

सत्काराला उत्तर देताना कु.पायल पटेल म्हणाली की,समता परिवार हा पतसंस्थेच्या माध्यमातून सभासद,ग्राहकांची सेवा करतच असतो.सामाजिक कार्यात देखील अग्रभागी राहून सहकार्य करणारा परिवार आहे.समताने माझे पालकत्व स्वीकारून इ.११ वी पासून ते बी.ई.पर्यंत आर्थिक मदत केली त्यामुळे समता परिवाराच्या आपण ऋणातच राहणार असून कोयटे माझे प्रेरणा स्र्रोत असून समताने माझे उज्वल भविष्य घडविण्यासाठी मार्गदर्शन व सहकार्य केले आहे.मला मिळालेले यशाचे सारे श्रेय त्यांनाच जाते असल्याचे गौरवाने नमूद केले आहे.

प्रसंगी कु.पायल पटेल हिने मिळविलेल्या यशाबद्दल समता चॅरिटेबल ट्रस्ट,समता नागरी सहकारी पतसंस्थेचे पदाधिकारी,अधिकारी कर्मचारी यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी सदिच्छा दिल्या आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close