जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कुऱ्हाडीच्या दांड्याने महिलेस मारहाण,कोपरगावात गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील नगदवाडी शिवारात पाणी भरण्याच्या कारणावरून महिलेला आरोपी सोपान रामदास लांडगे,राहुल सोपान लांडगे,रोहिणी सोपान लांडगे आदींनी कुऱ्हाडीच्या दांड्याने नुकतीच मारहाण करून जखमी केले असल्याची असल्याची फिर्याद कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात जयश्री अनिल लांडगे (वय-२७) रा.नगदवाडी यांनी दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.

फिर्यादी महिला आपल्या घराच्या अंगणात रस्त्यावर दि.०५ जुलै रोजी सायंकाळी ०७ वाजेच्या सुमारास पाणी भरत असताना त्यास आरोपी सोपान रामदास लांडगे,राहुल सोपान लांडगे,रोहिणी सोपान लांडगे आदींनी हरकत घेतली असून,”तू.येथे पाणी भरुच नको,पाणी आमच्या शेडमध्ये येईल” असे म्हणून आरोपींनीं संगनमताने शिवीगाळ करून कुऱ्हाडीच्या दांड्याने व लाथा बुक्यांनी मारहाण केली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी जयश्री लांडगे या नगदवाडी येथील रहिवासी असून सदर महिला आपल्या घराच्या अंगणात रस्त्यावर दि.०५ जुलै रोजी सायंकाळी ०७ वाजेच्या सुमारास पाणी भरत असताना त्यास आरोपी सोपान रामदास लांडगे,राहुल सोपान लांडगे,रोहिणी सोपान लांडगे आदींनी हरकत घेतली असून,”तू.येथे पाणी भरुच नको,पाणी आमच्या शेडमध्ये येईल” असे म्हणून आरोपींनीं संगनमताने शिवीगाळ करून लाथा बुक्यांनी मारहाण केली आहे.कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण करून जखमी केले असल्याची असल्याची फिर्याद कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात जयश्री अनिल लांडगे (वय-२७) रा.नगदवाडी यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.

सदर जखमी महिला कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत आहे.कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पो.हे.कॉ.ए.आर.वाखुरे यांनी घटनास्थळी पोलीस भेट दिली आहे.

कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात पोलीसांनी आरोपी विरुद्ध आपल्या दप्तरी गु.र.क्रं.२६३/२०२२ भा.द.वि.कलम ३२४,३२३,५०४,५०६,३४ या कलमा प्रमाणे दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.आर.पी.पुंड हे करीत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close