शैक्षणिक
देशी भाषांच्या माध्यमातून करिअरच्या संधी शोधण्याची गरज-यांचे प्रतिपादन

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
नवीन शैक्षणिक धोरणा नुसार राष्ट्रभाषा हिंदी आणि सर्वच भारतीय भाषांना नव्याने महत्त्व प्राप्त झाले असून विद्यार्थ्यांनी हिंदी आदी सर्वच भारतीय भाषांच्या माध्यमातून करिअरच्या नवीन संधी शोधल्या पाहिजेत,असे मत उत्तर प्रदेश चे माजी शिक्षण डॉ.रवींद्र शुक्ल यांनी कोपरगाव येथील एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले आहे.

“हिंदी आणि मराठी तसेच इतरही भारतीय भाषांमधील देशभक्तीपूर्ण काव्याने भारतीय स्वातंत्र्य चळवळीला बळ दिले आहे.हिंदी भाषा आणि साहित्याचे देशाच्या सामाजिक एकतेमध्ये मोठे योगदान आहे.विद्यार्थ्यांनी असे साहित्य वाचण्याचा त्याचे चिंतन केले पाहिजे”-पद्मकांत कुदळे,माजी नगराध्यक्ष,कोपरगाव नगरपरिषद.
कोपरगाव येथील स्थानिक के.जे.सोमैया महाविद्यालयाच्या पदव्युत्तर हिंदी विभाग,संशोधन केंद्र,अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व राष्ट्रभाषा सेवा मंच कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘राष्ट्रीय हिंदी दिन व गुणगौरव समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.त्यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रभाषा सेवा मंचचे अध्यक्ष पद्मकांत कुदळे होते.
सदर प्रसंगी संस्थेचे कार्यकारी विश्वस्त संदीप रोहमारे,कला शाखा व हिंदी विभाग प्रमुख डॉ.जिभाऊ मोरे,डॉ.गणेश शिंदे,प्रा.किरण सोळसे,प्रा.जावेद शहा,प्रा.संपत आहेर,प्रा.सचिन जाधव,प्रा.जगधने,सतीश दवंगे आदीसह बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.
त्यावेळी त्यांनी” भाषिकांच्या संख्येनुसार,इंग्रजी आणि चिनी भाषांनंतर हिंदी ही जगातील तिसरी मोठी भाषा आहे.पण नीट समजणाऱ्या,वाचणाऱ्या आणि लिहिणाऱ्यांमध्ये ही संख्या फार कमी आहे.तो कमी होत चालला आहे.यासोबतच इंग्रजी शब्दांचाही हिंदी भाषेवर मोठा प्रभाव पडला असून अनेक शब्द प्रचलित होऊन त्यांची जागा इंग्रजी शब्दांनी घेतली आहे.त्यामुळे भविष्यात ही भाषा नामशेष होण्याची शक्यताही वाढली आहे.ज्यांना हिंदीचे ज्ञान आहे किंवा हिंदी भाषा जाणते,अशा लोकांना त्यांच्या हिंदीबद्दलच्या कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी हा दिवस हिंदी दिवस म्हणून साजरा केला जातो,हिंदीतील राष्ट्रभक्ती आणि देशप्रेमाने भारावलेल्या काव्यपंक्ती सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.तसेच त्यांनी राज्यस्तरीय स्वरचित हिंदी कहानी लेखन स्पर्धेतील विजेत्या आणि सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
या वेळी माजी नगराध्यक्ष पद्मकांत कुदळे म्हणाले की,”हिंदी आणि मराठी तसेच इतरही भारतीय भाषांमधील देशभक्तीपूर्ण काव्याने भारतीय स्वातंत्र्य चळवळीला बळ दिले आहे.हिंदी भाषा आणि साहित्याचे देशाच्या सामाजिक एकतेमध्ये मोठे योगदान आहे.विद्यार्थ्यांनी असे साहित्य वाचण्याचा त्याचे चिंतन केले पाहिजे.हिंदी दिनानिमित्त आयोजित स्पर्धांमध्ये पारितोषिक प्राप्त करणाऱ्या आणि सहभागी होणाऱ्या सर्वच शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.
यावेळी उपस्थितांचे स्वागत प्राचार्य डॉ.विजय ठाणगे यांनी केले आहे तर प्रास्ताविक डॉ.जिभाऊ मोरे यांनी केले आहे तर सूत्रसंचालन डॉ.संजय दवंगे यांनी तर उपस्थितांचे आभार प्रा.गणेश शिंदे यांनी मानले आहे.याप्रसंगी सेवानिवृत्त कर्मचारी महेंद्र खंडवे यांचा मान्यवरांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला.



