जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
शैक्षणिक

सहकारातील शोध प्रबंधासाठी..यांना पी.एच.डी.

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

  सहकारी चळवळीचे अग्रस्थान असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील सहकारी संस्था आणि स्थानिक राजकारण हा नेहमीच अभ्यासाचा विषय राहिला आहे.याच पार्श्वभूमीवर येथील संशोधक अनिरुद्ध भरत जाधव यांना त्यांनी सादर केलेल्या ‘अहिल्यानगर जिल्ह्यातील सहकारी चळवळीचा राजकीय प्रक्रियेवर झालेला परिणाम’ या विषयावरील शोधप्रबंधासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून अधिकृतपणे विद्यावाचस्पती (विद्या वाचस्पती) ही पदवी प्रदान करण्यात आली आहे.

अनिरुद्ध जाधव यांच्या यशाबद्दल कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे प्राचार्य डॉ.विजय ठाणगे सत्कार करताना.

 

संशोधक अनिरुद्ध भरत जाधव यांनी सहकारातून समाजकारण आणि समाजकारणातून राजकारण हा प्रवास त्यांनी पुराव्यांसह अधोरेखित केला असून,हा अभ्यास भविष्यात राजकीय अभ्यासकांसाठी महत्त्वाचा दस्तऐवज ठरणार आहे.त्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

  अनिरुद्ध जाधव यांनी आपला हा महत्त्वपूर्ण शोधप्रबंध के.जे.सोमय्या महाविद्यालय, कोपरगाव येथील पदव्युत्तर राज्यशास्त्र संशोधन केंद्रांतर्गत पूर्ण केला.त्यांना या संशोधनासाठी राज्यशास्त्र विभागाचे मार्गदर्शक प्रो.डॉ.सुरेश मंजुळदास देवरे यांचे मार्गदर्शन लाभले होते.

के.जे.सोमय्या महाविद्यालय,कोपरगाव.

  अहिल्यानगर जिल्ह्यातील राजकारण कधीच सरळ राहिलेले नाही.येथील सहकारी नेत्यांनी साखर कारखाने,दूध संघ,पतसंस्था आणि शिक्षण संस्थांनी जिल्ह्यातील सत्तेच्या समीकरणांना,स्थानिक निवडणुकांना आणि राजकीय नेतृत्वाला कशी दिशा दिली,याचा सांख्यिकी अभ्यास जाधव यांनी आपल्या संशोधनातून मांडला आहे.सहकारातून समाजकारण आणि समाजकारणातून राजकारण हा प्रवास त्यांनी पुराव्यांसह अधोरेखित केला असून,हा अभ्यास भविष्यात राजकीय अभ्यासकांसाठी महत्त्वाचा दस्तऐवज ठरणार आहे.

  या लक्षवेधी यशाबद्दल के.जे.सोमय्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजय ठाणगे यांच्या हस्ते अनिरुद्ध जाधव व त्यांचे मार्गदर्शक प्रा.डॉ.सुरेश देवरे यांचा महाविद्यालयात विशेष सत्कार करण्यात आला आहे.यावेळी बोलताना प्राचार्य डॉ.ठाणगे यांनी जाधव यांच्या कार्याचे कौतुक केले आणि हे संशोधन जिल्ह्याच्या राजकीय-सामाजिक अभ्यासासाठी दिशादर्शक ठरेल असा विश्वास व्यक्त केला आहे.

  या यशाबद्दल कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे,सचिव ॲड.संजीव कुलकर्णी,विश्वस्त संदीप रोहमारे,प्राध्यापक वर्ग,शिक्षकेतर कर्मचारी आदींनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close