जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
शैक्षणिक

शालांत परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

     कोपरगाव शहरातील श्रीमान गोकुळचंदजी विद्यालय येथे एस.एस.सी.बोर्ड परीक्षा फेब्रुवारी-२०२६ मध्ये उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाला आहे.सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोपरगाव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष कैलास ठोळे हे होते.

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करताना कैलास ठोळे,डॉ.अमोल अजमेरे,सचिन अजमेरे आणि मान्यवर दिसत आहेत.

   

“कृत्रिम बुद्धिमत्ता (ए.आय.),आधुनिक तंत्रज्ञान आणि कौशल्याधारित शिक्षणाच्या युगात स्वतःला सक्षम बनवावे.ज्ञान,कौशल्य आणि संस्कार यांच्या बळावर विद्यार्थी भविष्यात मोठे यश संपादन करतील” -कैलास ठोळे,अध्यक्ष,कोपरगाव एज्युकेशन सोसायटी.

    कोपरगाव येथील श्रीमान गोकुळचंद विद्यालयाने यंदाही आपली उज्ज्वल निकालाची परंपरा कायम राखत विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.एस.एस.सी बोर्ड परीक्षेत साई नारायण कुलकर्णी याने ९७.०० % गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला आहे.वेदांत सचिन येवले याने ९५.६० %  गुणांसह द्वितीय क्रमांक,तर पार्थ मच्छिंद्र लोहोकणे याने ८६.६० % गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक संपादन केला आहे.तसेच ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार याप्रसंगी करण्यात आला.

     यावेळी कोपरगाव एज्युकेशन सोसायटीचे सदस्य डॉ.अमोल अजमेरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना स्पर्धात्मक युगातील संधी आणि आव्हानांची जाणीव करून दिली.यशस्वी होताना आपल्या शाळेशी व संस्कारांशी असलेली नाळ कायम जपावी,असे त्यांनी सांगितले.

    कोपरगाव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष कैलास ठोळे म्हणाले की,”कृत्रिम बुद्धिमत्ता,आधुनिक तंत्रज्ञान आणि कौशल्याधारित शिक्षणाच्या युगात स्वतःला सक्षम बनवावे.ज्ञान,कौशल्य आणि संस्कार यांच्या बळावर विद्यार्थी भविष्यात मोठे यश संपादन करतील,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

   या प्रसंगी स्कूल कमिटीचे अध्यक्ष चंद्रकांत ठोळे,सचिव दिलीप अजमेरे,सहसचिव सचिन अजमेरे,खजिनदार आनंद ठोळे,सदस्य डॉ.अमोल अजमेरे,राजेश ठोळे,संदीप अजमेरे,दिलीप तुपसैंदर यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांस शुभेच्छा दिल्या.

   या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक रघुनाथ लकारे,पर्यवेक्षक बलभीम उल्हारे तसेच सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी,पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिगंबर देसाई यांनी केले तर उपस्थियांचे आभार सुरेंद्र शिरसाळे यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close