शैक्षणिक
शिष्यवृत्ती परीक्षेत…ही शाळा राज्यात प्रथम!

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात सर्वाधिक विद्यार्थी पात्र ठरण्याचा मान कोकमठाण येथील आत्मा मालिक सेमी इंग्लिश मिडीयमने मिळवीला. या विद्यालयाचे तब्बल ३८४ विद्यार्थी पात्र ठरले.हि संख्या राज्यात सर्वाधिक असल्याची माहिती प्राचार्य निरंजन डांगे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.

“आमच्या शाळेला मिळालेले हे यश आत्मा मालिक पॅटर्नचे आहे.शिष्यवृत्ती परीक्षा,स्पर्धा परीक्षा,प्रवेश परीक्षा व शालेय परीक्षांमध्ये आत्मा मालिक सेमी इंग्लिश मिडीयम गुरूकुल हे सातत्याने राज्यात आपले वेगळे स्थान निर्माण करीत आहेत.त्यात शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या परिश्रमाचा मोठा वाटा आहे” -नंदकुमार सुर्यवंशी,अध्यक्ष विश्वात्मक,जंगली महाराज आश्रम ट्रस्ट.कोकमठाण.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,”महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,शिक्षण विभागाच्या वतीने हि परीक्षा घेतली जाते.या परिक्षेत पात्र ठरलेल्या ३८४ विद्यार्थ्यांत १० विद्यार्थ्यांनी अडिचशेहून अधिक,७८ विद्यार्थ्यांनी दोनशेवीसहून अधिक तर १४२ विद्यार्थ्यांनी दोनशेहून अधिक तर २२४ विद्यार्थ्यांनी १८० हून अधिक गुण प्राप्त केले.इयत्ता आठवी मध्ये तेजस चोंडगीर २६४,मंगेश कदम २६२,वैभवी जाधव २६०,करण चरवांडे २५८,धनंजय दहिफळे २५४ तर स्वराली काळे २५२ गुण मिळवीले. इयत्ता पाचवीत सार्थक जोरवर २५६,भूषण धोणे २५४ , सार्थक शिंदे २५४,युवराज गर्जे २५० ,संकेत साप्ते २४८,आर्यन वाळेकर २३८,प्रद्युम्न घुमरे २३६ गुण मिळवीले आहे.
या विद्यार्थ्यांना प्राचार्य निरंजन डांगे,विभाग प्रमुख सचिन डांगे,अनिल सोनवणे,बाळकृष्ण दौंड,रवींद्र देठे,मिना नरवडे,रमेश कालेकर तसेच पर्यवेक्षक गणेश रासने,नयना आदमाने,सुनील पाटील,नितीन अनाप व विषय शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले.
या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी,उपाध्यक्ष बाळासाहेब गोरडे,सरचिटणीस हनुमंत भोंगळे,कोषाध्यक्ष विठ्ठल होन,विश्वस्त प्रकाश गिरमे,प्रदीपकुमार भंडारी, शालेय व्यवस्थापक सुधाकर मलिक,वसतिगृह व्यवस्थापक साईनाथ वर्पे,मीरा पटेल यांनी अभिनंदन केले आहे.



