जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
शैक्षणिक

शिक्षणामुळे स्त्रियांचे काम लक्षणीय-सुमंत

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

   पूर्वीची स्त्री घराच्या राहाटात अडकलेली होती आज तीचं स्त्री शिक्षणामुळे समाजाला दिशा दर्शक भूमिका बजावत असून समाजाचे बंधन तोडून ती समाजात उल्लेखनीय कार्य करत असल्याचे प्रतिपादन कवी व वात्रटिकाकर नारायण सुमंत यांनी कोपरगाव येथील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

सदर प्रसंगी कल्पना महानुभाव यांनी लिहिलेल्या,”पोस्टर पैलवान’ या कथासंग्रहचा प्रकाशनाचा सोहळा संपन्न झाला आहे.यावेळी उपस्थित मान्यवरांच्या उपस्थित कल्पना महानुभाव यांचा सत्कार करण्यात आला आहे.

  कोपरगाव येथील शिक्षिका कल्पना हिरालाल महानुभाव या आपल्या बत्तीस वर्षाच्या शिक्षण क्षेत्रातील सेवेतून सेवानिवृत्त झाल्या त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोदावरी पारजणे तालुका सहकारी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे हे होते.

 

सदर प्रसंगी कल्पना महानुभाव यांनी लिहिलेल्या,”पोस्टर पैलवान’ या कथासंग्रहचा प्रकाशनाचा सोहळा संपन्न झाला आहे.

  सदर प्रसंगी यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सिनेअभिनेते चिन्मय उदगीरकर यांचेसह महानंदाचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र जाधव,कैलास ठोळे,आदिनाथ ढाकणे,माजी नगराध्यक्षा ऐश्वर्या सातभाई,माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे,कोल्हे कारखाण्याचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर परजणे,डॉ.अमोल अजमेरे,हिरालाल महानुभाव,ॲड.सातव,ॲड.शरद गुजर,डॉ. निखिल महानुभाव,डॉ.प्रतीक्षा महानुभाव,सुनील बोरा,कल्पेश शहा,तारा पाटील, संतोष तांदळे,गणेश कानडे,सचिव राजेंद्र साळूंके,केशवराव भोजने,प्रकाश आंबेकर,प्रा.काशिनाथ वाकचौरे,प्रा.नामदेव उबाळे,रवींद्र लोहाडे,नानासाहेब रणशूर आदी मान्यवर उपस्थित होते.

  त्यावेळी पुढे बोलताना म्हणाले की,”आजचे तरुण कोणतेही लेखन करतांना दिसत नाही.मोबाईनने सगळे लेखन संपूवून टाकले आहे.त्याप्रमाणे लोकांचा वाचनाचा छंद संपला आहे.साहित्य परंपरा संपली तर मराठी भाषा व साहित्याची गंगा पुढे वाहणार कशी याची जास्त काळजी वाटते.कल्पना महानुभाव यांचे पोस्टर पैलवान कथासंग्रहचा देखील समाजाला दिशा दर्शक ठरणार असल्याचे प्रतिपादन शेवटी केले आहे.

  यावेळी राजेश परजणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे.

   सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिरालाल महानुभाव यांनी केले आहे.त्यावेळी त्यांनी कल्पना महानुभाव ह्या 32 वर्षाच्या सेवेतून निवृत्त झाल्या आहेत.माझ्या सामाजिक कार्यात कल्पना यांचा पत्नी म्हणून सिंहाचा वाटा आहे.कोपरगाव तालुका सहाय्यक समितीच्या माध्यमातून अनेक शिक्षण संस्था उभारत असतांना कौंटुबिक जबाबदारी पत्नीने पार पडल्यामुळे मला यात कुठल्याही अडचणी आल्या नसल्याचे शेवटी कौतुक केले आहे.

  सदर प्रसंगी कल्पना महानुभाव यांनी लिहिलेल्या,”पोस्टर पैलवान’ या कथासंग्रहचा प्रकाशनाचा सोहळा संपन्न झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close