शैक्षणिक
…या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड

न्युजसेवा
कोपरगाव (प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील कर्मवीर शंकरराव काल एज्युकेशन सोसायटीच्या सुशीलामाई काळे हाविद्यालयात ‘कॅटा फार्मा केमिकल्स’ या कंपनीच्या वतीने रिक्त जागांसाठी घेण्यात आलेल्या मुलाखतीमध्ये तृतीय वर्षातील २१ विद्यार्थ्यांची निवड झाली असल्याची माहिती प्राचार्या डॉ.विजया गुरसळ यांनी दिली आहे.

नोकरी किंवा करिअर मेळा हा एक विशेष कार्यक्रम आहे ज्याचा उद्देश कंपन्या आणि संभाव्य कर्मचाऱ्यांना एकत्र आणणे आणि माहिती सामायिक करणे आहे. ज्या कंपन्या कर्मचारी तसेच प्रशिक्षण कार्यक्रमांसाठी नवीन पदवीधरांची भरती करू पाहत आहेत अशा कंपन्यांद्वारे हे जॉब फेअर आयोजित केले जातात.
विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असतांनाच नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी संस्थेच्या सचिव चैताली काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन करण्यात आले होते.महाविद्यालय नेहमी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देण्यासाठी प्रयत्नशील असते त्यामुळे त्यांना त्यांच्या करिअरमध्ये यश मिळालं आहे.महाविद्यालयाने आम्हाला वेळोवेळी कौशल्य विकसीत करण्याची संधी उपलब्ध करून दिल्यामुळे उद्योगाच्या गरजा ओळखण्याचे महत्त्व शिकवले गेले त्यामुळे केलेल्या तयारीतून आम्हाला नोकरीच्या संधी उपलब्ध झाली असल्याचे निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी सांगितले आहे.
सुशीलामाई काळे महाविद्यालयात ‘कॅटा फार्मा केमिकल्स’ या कंपनीच्या वतीने एच आर ऑफिसर सोनाली कुरील व प्रोडक्शन मॅनेजर संतोष शिंदे यांनी विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या.या मुलाखतीमध्ये महाविद्यालयातील एकूण ४३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला त्यापैकी २१ विद्यार्थ्यांची नोकरी करिता निवड करण्यात आली.यामध्ये विज्ञान विभागाचे १४,वाणिज्य विभागाचे ०६ व कला शाखेच्या ०१ अशा एकूण २१ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष माजी आ.अशोक काळे, आ.आशुतोष काळे,सचिव चैताली काळे सर्व गव्हर्निंग कौन्सिल सदस्य,प्राचार्या डॉ.विजया गुरसळ यांनी अभिनंदन करून त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.