जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निधन वार्ता

विमल खालकर यांचे निधन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील निळवंडे कालवा कृती समितीचे कार्यकर्ते स्व.दिलीप लहानू खालकर यांची धर्मपत्नी विमल दिलीप खालकर (वय-४२) यांचे नुकतेच दीर्घ आजाराने निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात एक मुलगा,एक मुलगी असा परिवार आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

स्व.विमल खालकर या अत्यंत धार्मिक व मनमिळावू स्वभावाच्या म्हणून रांजणगाव देशमुख आणि परिसरात परिचित होत्या.त्यांच्यावर रांजणगाव देशमुख येथील स्मशानभूमीत काल दुपारी ४ वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.त्या शुभम खालकर यांच्या मातोश्री होत्या.

त्यांच्या निधनाबद्दल निळवंडे कालवा कृती समितीचे संस्थापक नानासाहेब जवरे,अध्यक्ष रुपेंद्र काले,उपाध्यक्ष संजय गुंजाळ,सोन्याबापू उऱ्हे,गंगाधर रहाणे,संघटक नानासाहेब गाढवे,सचिव कैलास गव्हाणे,नामदेव दिघे,ऍड.योगेश खालकर,पत्रकार संघाचे माजी तालुकाध्यक्ष शिवाजीराव गायकवाड,बाळासाहेब रहाणे,जेष्ठ नेते उत्तमराव जोंधळे,भाऊसाहेब गव्हाणे,बाबासाहेब गव्हाणे,गोरक्षनाथ शिंदे,तानाजी शिंदे,आदींनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close