निधन वार्ता
प्राचार्य सोनवणे यांचे निधन !

न्यूजसेवा
संवत्सर (वार्ताहर)
कोपरगांव तालुक्यातील संवत्सर येथील रहिवासी व पुरणगांव येथील आत्मा मालिक इंग्लिश मेडियम गुरुकुल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य योगेश दिगंबर सोनवणे यांचे शनिवार दि.२२ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे.संवत्सर येथे गोदावरी काठावरील अमरधामध्ये रात्री त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. यावेळी संवत्सर,उंदिरवाडी तसेच आत्मा मालिक संस्थेमधील शिक्षक,विद्यार्थी यांच्यासह मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

कै.प्राचार्य योगेश सोनवणे यांचा शिक्षण क्षेत्राबरोबरच सामाजिक,सांस्कृतिक,आध्यात्मिक क्षेत्रात चांगला सहभाग होता.आपल्या मनमिळाऊ स्वभावाने त्यांनी मोठा मित्र परिवार जमविला होता.एक हरहुन्नरी,प्रतिभासंपन्न व कलासक्त व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख होती.आपल्या कामातून व प्रेमळ स्वभावातून त्यांनी असंख्य विद्यार्थी,सहकारी आणि आप्तस्वकियांच्या मनात आपले अढळ स्थान प्राप्त केले होते.आत्मा मालिक शिक्षण संस्थेच्या माध्यमातून अध्यापनाबारेवरच संस्थेच्या धर्मिक,सांस्कृतिक कार्यात त्यांचा सतत सहभाग होता.
कै.प्राचार्य योगेश सोनवणे यांचा शिक्षण क्षेत्राबरोबरच सामाजिक,सांस्कृतिक,आध्यात्मिक क्षेत्रात चांगला सहभाग होता.आपल्या मनमिळाऊ स्वभावाने त्यांनी मोठा मित्र परिवार जमविला होता.एक हरहुन्नरी,प्रतिभासंपन्न व कलासक्त व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख होती.आपल्या कामातून व प्रेमळ स्वभावातून त्यांनी असंख्य विद्यार्थी,सहकारी आणि आप्तस्वकियांच्या मनात आपले अढळ स्थान प्राप्त केले होते.आत्मा मालिक शिक्षण संस्थेच्या माध्यमातून अध्यापनाबारेवरच संस्थेच्या धर्मिक,सांस्कृतिक कार्यात त्यांचा सतत सहभाग होता.सद्गुरुवर अपार श्रध्दा आणि विश्वात्मक कार्यामध्ये अनमोल योगदान देणारे क्रियाशिल शिक्षक म्हणून त्यांचा आत्मा मालिक संस्थेमध्ये व इतरत्र देखील चांगला परिचय होता.शिक्षण क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान, विद्यार्थ्यांप्रती असलेले आपुलकीचे आणि सर्वांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध सदैव स्मरणात राहतील.त्यांच्या निधनाने कधीही भरुन न निघाणारी पोकळी निर्माण झाली असल्याच्या प्रतिक्रिया त्यांचे विद्यार्थी,विद्यार्थीनी तसेच मित्र परिवार,आप्तेष्ट,नातेवाईक यांच्यामधून व्यक्त केल्या जात आहेत.त्यांच्या अंत्यविधीसमयी संवत्सर पंचक्रोशीतील अनेक मित्रपरिवार, नातेवाईक,आत्मा मालिक संस्थेतील शिक्षक,विद्यार्थी,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कै.प्राचार्य योगेश सोनवणे यांच्या निधनाचे वृत्त कळताच गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे,पंचायत समितीचे माजी सदस्य कृष्णराव परजणे,माजी सरपंच सुलोचना ढेपले, माजी उपसरपंच विवेक परजणे आदींनी शोक व्यक्त केला आहे.



