निधन वार्ता
शिवाजी भोसले यांना मातृशोक!

न्यूजसेवा
कोपरगाव (प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील रहिवासी व माजी ग्रामपंचायत सदस्य शिवाजी एकनाथ भोसले यांच्या मातोश्री सीताबाई एकनाथ भोसले (वय-87) यांचे आज सकाळी 6.45 वाजता वृद्धापकाळाने निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात दोन मुले,दोन मुली,नातवंडे आदी मोठा परिवार आहे.त्यांचेवर जवळके येथील अमरधाम येथे शोकाकुल वातावरणात आज दुपारी 12.30 वाजता करण्यात आला आहे.त्यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

मृत्यू पश्चात महिलेने केले नेत्रदान,सर्वत्र कौतुक
व.सीताबाई भोसले या अत्यंत धार्मिक आणि मनमिळाऊ स्वभावाच्या म्हणून जवळके परिसरात परिचित होत्या.त्यांनी आपल्या हयातीत मृत्यू नंतर नेत्रदान करण्याच्या संकल्प केला होता.तो त्यांच्या कुटुंबीयांनी शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थांन रुग्णालयाचे माध्यमात पूर्ण केला असून नेत्रदान केले आहे.त्यावेळी रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अशोक गावित्रे आणि त्यांचे सहकाऱ्यांनी ती भूमिका पार पाडून कुटुंबाचे कार्याचे कौतुक केले आहे.
स्व.सीताबाई भोसले या अत्यंत धार्मिक आणि मनमिळाऊ स्वभावाच्या म्हणून जवळके,बहादराबाद परिसरात परिचित होत्या.त्यांनी आपले पती स्व.एकनाथ भोसले यांचे सन-2012 साली निधन झाल्यावर आपल्या कुटुंबाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली होती.त्यांची आणि त्यांच्या कुटुंबाची श्री क्षेत्र नाणिज येथील नरेंद्र स्वामी महाराज यांच्यावर अगाध श्रद्धा होती.त्यांनी आपल्या हयातीत मृत्यू नंतर नेत्रदान करण्याच्या संकल्प केला होता.तो त्यांच्या कुटुंबीयांनी शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थांन रुग्णालयाचे माध्यमात पूर्ण केला असून नेत्रदान केले आहे.

दरम्यान त्यावेळी रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अशोक गावित्रे आणि त्यांचे सहकाऱ्यांनी ती भूमिका पार पाडून कुटुंबाचे कार्याचे कौतुक केले आहे.त्यावेळी स्व.सीताबाई भोसले यांचे पुतणे माजी उपसरपंच वाल्मीक भोसले यांनी उपस्थितांसह ग्रामस्थांना नेत्रदानाचा असा प्रेरणादायी संकल्प करण्याचे आवाहन केले आहे.स्व.सीताबाई भोसले यांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे या मरणोत्तर नेत्रदानाचे कोपरगाव तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.



